प्रशांत किशोरांनी केली जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा

2 hours ago 1

प्रख्‍यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (२ ऑक्‍टोबर) आपल्‍या जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा केली.File photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

02 Oct 2024, 12:17 pm

Updated on

02 Oct 2024, 12:17 pm

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (२ ऑक्‍टोबर) आपल्‍या जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा केली. 2 ऑक्टोबर 2022 रोजीपासून त्‍यांनी बिहारमध्ये जनसुराज मोहिमेअंतर्गत पदयात्रा सुरू केली होती. गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये त्यांनी बिहारमधील १७ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढल्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला पदयात्रेनंतर आज त्‍यांनी आपल्‍या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा केली आहे.

#WATCH | Patna, Bihar | Jan Suraaj founder Prashant Kishor officially launched his political party - Jan Suraaj Party.

He says, "If Bihar has to have a world-class education system, Rs 5 lakh crore is needed in the next 10 years. When the liquor ban will be removed, that money… pic.twitter.com/w8Og4Cn2NX

— ANI (@ANI) October 2, 2024

पाच हजार किलोमीटर पदयात्रा

प्रशांत किशोर यांनी स्‍पष्‍ट केले होते की, आपला जनसुराज पार्टी हा पक्ष कोणत्‍याही व्यक्ती, कुटुंब, जात किंवा वर्ग यांच्‍यासाठी नसून सर्वांसाठी असेल. नवीन बिहारचा प्रचार करायचा की पक्षाचा उद्देश? संघटनेने संपूर्ण बिहारमधील लोकांना पाटण्यात येण्याचे आवाहन केले होते. प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2022 रोजी गांधी जयंतीनिमित्त पश्चिम चंपारण येथून जन सुराज यात्रेला सुरुवात केली होती. या माध्‍यमातून त्‍यांनी सुमारे 5000 किलोमीटर पदयात्रा केली. 17 जिल्हे, 2697 ग्रामसभा, 235 गट आणि 1319 पंचायतीमधून ही यात्रा पार पडली. आता इतक्या दिवसांच्या पदयात्रेनंतर राज्य पक्षाची घोषणा झाली आहे. पक्षाचे नेतृत्व मगास, अति मगास, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि उच्च जाती या सर्व जाती समुदायातील लोकांच्या हातात असेल, असे प्रशांत किशोर यांनी यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे.

प्रशांत किशोर करणार नाहीत पक्षनेतृत्त्‍व

२८ जुलै २०२४ रोजी आयोजित कार्यशाळेत बोलताना प्रशांत किशोर म्‍हणाले होती की, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सुमारे एक कोटी सदस्य जनसुराज पार्टीची अधिकृत घोषणा करतील. याच दिवशी पक्षाच्‍या एक कोटी संस्थापक सदस्यांपैकी दीड लाख पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली जाईल.बिहारचा नेता सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने बनविला जाईल. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जनतेची ताकद वाढवणारे नेते आपापल्या मतदारसंघातून निवडून येतील. 2025 मध्ये ते राज्यात सरकार बनवतील आणि नवीन बिहार बनवण्याचे काम सुरू होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला होता. बापू सभागृहात आयोजित कार्यशाळेत भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांची नात डॉ.जागृती, बक्सरमधून लोकसभा निवडणूक लढवलेले माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा, राजदचे माजी विधानपरिषद रामबली चंद्रवंशी, माजी खासदार मोनाजीर हसन आदींनी जनहिताचे सदस्यत्व घेतले. यावेळी सात सदस्यीय निवडणूक समिती आणि १३१ सदस्यीय घटना समितीची घोषणाही त्‍यावेळी करण्‍यात आली होती.

बिहारमधील सर्व २४३ जागा लढवणार

प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 21 नेत्यांची समितीही स्थापन करण्यात येणार आहे. उमेदवारांशी संबंधित बाबी पाहतील, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article