सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा फेव्हरेट मराठी कार्यक्रम म्हटलं तर तो महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एवढच नाही तर त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरपासून ते डायलॉग सर्वांना पाठ आहे.
समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे-संभेराव, ओंकार राऊत, चेतना भट, श्याम राजपूत, रोहित माने, इशा डे, रसिका वेंगुर्लेकर अशा विनोदवीरांनी भरलेली ही हास्यजत्रा आणि याचे कॅप्टन दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे हे सुद्धा आता प्रेक्षकांच्या घरातील सदस्यांप्रमाणेच झाले आहेत.
ईशा डेचं नाव खरं काहीतरी वेगळंच
दरम्यान या कार्यक्रमातील सर्वच सदस्याच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्यापैकी चाहत्यांना माहित आहे. पण यातील एक कलाकार इशा डेबद्दल मात्री काही गोष्टी नक्कीच माहित नसेल. इशा डेच्या अभिनय, कॉमेडपासूनच तिच्या नावाबद्दलही बरीच चर्चा होताना दिसते.खरं तर तिच्या नावाचा भन्नाट किस्सा आहे. जो मुलाखतीमध्ये तिने सांगितला आहे.
ईशा डे नाव ऐकून बऱ्याच जणांनी ती बंगाली, ख्रिश्चन आहे अशा चर्चा केल्या, पण ईशाचं खरं आडनाव हे ‘डे’ नसून दुसरच आहे. मग तरीही ईशा तिच्या नावापुढे ‘डे’ हे आडनाव म्हणून का लावते असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असले,
इशा डे’ या नावामुळं अनेकजण तिला अमराठी समजतात. मात्र लंडनमध्ये अभिनयाचं शिक्षण घेताना नावात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं यावेळी सांगितलं. यामागे फार इंट्रेस्टींग अशी गोष्ट आहे. जी ईशानेच सांगितली आहे.
ईशा डेनं काय सांगितला नावाचा किस्सा
एका मुलाखती दरम्यान ईशान तिच्या आडनावाबद्दलचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी बंगाली नाही; तर मराठीच आहे. माझं आडवान हे वडनेरकर असं आहे. मी इशा वडनेरकर. मी लंडन स्कूल ऑफ ड्रामात शिकायला होते. तेव्हा तिथं ऑडिशन द्यायला जायचे,15 मिनिटांचा तो स्लॉट असायचा. आपले उच्चार आणि त्यांचे उच्चार फार वेगळे आहेत. मी माझं नाव सांगायचे, ते तिथल्या लोकांना कळायचं नाही.”
ईशा पुढे म्हणाली, “तिथे व आणि व, W आणि Dचे उच्चार फार वेगळ्या पद्धतीने केला जातो. ऑडिशनला मी माझं नाव सांगितल्यानंतर तिथल्या लोकांना कळायचं नाही. माझं नाव उच्चारण्यातच 5 मिनिटं जायची. मग आमचे ट्युटर होते त्यांनी मला सल्ला दिला की तू तुझं सोप नाव ठेव. त्यामुळे मी अगदी सहज, ईशा डे… हे छान साऊंड करतं, घेऊन टाकूया, असं म्हणून मी नाव दिलं”. हा किस्सा सांगत ईशाने तिच्या आडनावाबद्दलचा हा गोंधळ दूर केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करणारी ईशा डे हि मराठीतील अत्यंत टॅलेटेंड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिची फॅन फॉलोईंगही प्रचंड प्रमाणात आहे.