बसस्थानकात पार्किंग सुविधा केलेली असताना ही सर्रास वाहनांची पार्किंग:बुलडाणा येथील बसस्थानकात ‘नो पार्किंग झोन'चे होते उल्लंघन
2 hours ago
1
बुलडाणा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील बसस्थानकात 'नो पार्किंग झोन' बुलडाणा उल्लंघन होत आहे. परिणामी बसचालकांसह प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या मुळे परिसरात काही किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे बसस्थानकात पार्किंग ची व्यवस्था असताना ही या ठिकाणी वाहन उभे असल्याने बुलडाणा व्यक्त केले जात आहे. बुलडाणा शहर हे जिल्ह्याचे ठिकाणच असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ देखील आहे. त्यामुळे दररोज जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक विविध कामांसाठी तर शाळकरी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सोबतच परजिल्ह्यांतील नागरिकांचीही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतू दुचाकी व चारचाकी वाहनधारकाकडून नो पार्किंग झोन बुलडाणा उल्लंघन होत असल्याने एसटी चालकासह प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा शहरात मोठया प्रमाणात नागरिक येतात. अनेक नागरिक हे आगमनासाठी दुचाकींचा वापर करतात तर काही नागरिक हे एस. टी. बसने प्रवास करणे पसंद करतात. त्यामुळे बुलडाणा बस स्थानक परिसर हे गर्दीने गजबजलेले असते. अश्याच अनेक नागरिक हे आपल्या आप्त स्वकीयांचा सोडण्यासाठी घेण्यासाठी दुचाकी बसस्थानकात येतात. अशावेळी त्यांच्याकडील दुचाकी या प्लॅटफॉर्मवर व बाजूला लावतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकींची मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. तसेच एस. टी. चालकांनीही याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधितांनी या बाबीकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी व एस. टी. कर्मचाऱ्यांकडून होत आहे. बस स्थानकावर नो पार्किंग झोन मध्ये असलेल्या गाड्या. विभाग नियंत्रकांचा प्रतिसाद नाही बुलडाणा बस स्थानकातील नो पार्किंग झोन संदर्भात बुलडाणा विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांना दोन वेळा संपर्क केला असताना कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)