स्पर्धेत अकरा, तेरा, पंधरा, सतरा, एकोणीस वयोगटामध्ये एकेरी आणि दुहेरी गटाच्या होणार आहेत. महिलांमध्ये होणार्या गटामध्ये खुला गट, 30 वर्षावरील, 35 वर्षावरील, 40 वर्षावरील आणि 45 वर्षावरील अशा एकेरी आणि दुहेरी गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत तब्बल दहा वयोगटात मुली आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे.
स्पर्धेतील सर्व वयोगटातील विजेत्यांना तब्बल अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, पदके, ट्रॉफी तर सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तरी या पुढारी राईज अप महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मुली,महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन दैनिक पुढारीच्या वतीने करण्यात आले आहे.