बांधकाम कामगारांनी संघटीत झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत:बार्शीत आयटकचे अधिवेशनात प्रा. ठोंबर यांचे प्रतिपादन
2 hours ago
1
बांधकाम कामगारांनी संघटीत होवून सामाजिक व राजकीय दबाव निर्माण केल्याशिवाय बांधकाम कामगारांचे प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन प्रा. तानाजी ठोंबरे यांनी केले. सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटन संलग्न लाल बावटा जनरल कामगार युनियन आयटकच्या पहिल्या स्थापना अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. ए.बी. कुलकर्णी यांनी असंघटीत क्षेत्रातील सर्वात जास्त कष्ट करणारा व काम करणारा बांधकाम वर्ग असून त्याला सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी चांगला माणूस व कुटूंब म्हणून उभा करण्यासाठी आयटक या संघटनेने प्रयत्न केला आहे. बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बांधकाम कामगारांनी जे लाभ व योजना मंडळाने कामगारांना दिल्या आहेत ते टिकवण्यासाठी तसेच नविन गोष्टी मागण्यासाठी लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या आयटकच्या झेंड्याखाली व नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. या अधिवेशना प्रसंगी एकमताने ठराव करण्यात आले तसेच नविन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडण्यात आली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)