बारामतीत नाट्यमय घडामोडी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, जोरदार घोषणाबाजी

2 hours ago 1

बारामतीत आज चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना बारामतीतून तुम्हीच निवडणूक लढवा, अशी विनंती केली.

बारामतीत नाट्यमय घडामोडी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली

| Updated on: Oct 08, 2024 | 5:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत अजित पवारांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बारामतीमधून तुम्हीच लढा. बारामतीमधील आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. अजित दादा तुम्ही आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, असा हट्ट कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमलेले बघायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या आक्रमकपणामुळे अजित पवार गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी कार्यकर्तायंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी आज बारामतीत ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची गाडी अडवत बारामतीमधून तुम्हीच निवडणूक लढवा, असं सांगत त्यांची गाडी अडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना गाडीबाहेर येण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवार गाडीच्या बाहेर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. “तुमच्या मनातला उमेदवार मी देईन”, असं आश्वासन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article