बिडकीन डीएमआयसीत 3 वर्षांत उभे राहणार 40 हून अधिक उद्योग:चौपदरीकरणामुळे पैठण एमआयडीसीत नवीन उद्योग येण्याची आशा
1 day ago
1
बिडकीन डीएमआयसीमध्ये उद्योगासाठी ८ हजार एकर परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे टोयोटा किर्लोस्कर, एथरचा दुचाकी प्रकल्प आणि इतर उद्योग आले आहेत. सध्या काही उद्योगांचे काम सुरू झाले आहे. यात नाथ ग्रुपच्या उद्योगाचे काम वेगाने सुरू असून पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पन्नास हजार युवकांना प्रत्यक्षात रोजगार उपलब्ध होईल. शिवाय बिडकीन डीएमआयसीतील इतर उद्योग पैठण एमआयडीसीमध्ये येण्यासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. पैठण-संभाजीनगर रोडवरील ३ हजार २०० हेक्टरवर डीएमआयसी बारा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली. ८ हजार एकरमध्ये उद्योगाला पाहिजे, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढील तीन वर्षांत आपले उद्योग उभे राहतील, त्या अनुषंगाने उद्योजकांना सूचना करण्यात आल्याचे ऑरिक सिटीचे व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले. पैठण एमआयडीसीमध्येही काही नवीन उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन तशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी, नगरसेवक बजरंग लिंबोरे, पवन लोहिया यांनी सांगितले. सध्या ४० उद्योगांपैकी तीन उद्योगांचे काम वेगाने सुरू असल्याने पैठण तालुक्यात नवचैतन्य येत असल्याचे दिसत आहे. बिडकीनमध्ये पुढील तीन वर्षांत नवीन उद्योग उभे राहणार असल्याने स्थानिकांना यात अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य राहील, असे नियोजन असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर’चा बिडकीन औद्योगिक वसाहतीत दुचाकी निर्मिती प्रकल्प पुढील तीन वर्षांत उभा राहणार आहे. विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर एनर्जी’ने देशातील तिसऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथे १०० एकरांच्या भूखंडाची निवड केली आहे, असे डीएमआयसीसंदर्भातील अभ्यासक निखिल भालेराव यांनी सांगितले. टोयोटा-किर्लोस्करचा उद्योग बिडकीन डीएमआयसीमध्ये उभा राहत आहे. यावर आधारित इतर लहानमोठे २५ च्यावर उद्योग पुढील तीन वर्षांत बिडकीनमध्ये येतील, असे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. यात पैठण एमआयडीसीमध्येही नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार भुमरे यांनी सांगितले. वसाहतीत दुचाकी निर्मिती प्रकल्पही, १०० एकरांच्या भूखंडाची निवड तीन उद्योग वेगात
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)