पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डसाठी तरुणाचा निर्घृण खून File Photo
Published on
:
26 Jan 2025, 9:52 am
Updated on
:
26 Jan 2025, 9:52 am
सांगली : पुढारी वृत्तसेवा
शंभर रुपयांचा मोबाईल स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत तरुणाचा निर्घृण खून केला. विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाची घटना ही आज (रविवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत विपुल गोस्वामी हा शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगार म्हणून काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. हा खून पूर्वनियोजित होता का याचा पोलीस तपास करत आहेत.