Published on
:
07 Feb 2025, 12:30 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:30 am
पणजी : गोव्याच्या रामा बावसकर व नितीन सावंत या जोडीने उत्तराखंडमधील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बीच व्हॉलीबॉलमध्ये कांस्यपदक मिळवले. स्पर्धेच्या इतिहासात रामा याचे हे तिसरे पदक आहे.
बीच व्हॉलीबॉल स्पर्धा उत्तराखंडमधील तेहडी येथील शिवपुरी नदीच्या किनारी झाली. गुरुवारी सकाळी तिसर्या क्रमांकाच्या लढतीत गोव्याने तेलंगणाच्या जोडीवर अटीतटीच्या लढतीत 2-1 फरकाने मात केली. गोव्याचे हे स्पर्धेतील अधिकृत तिसरे पदक ठरले.
गोव्याला स्क्वॉश व योगासनात सुवर्णपदक मिळाले आहे. रामा याने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बीच व्हॉलिबॉलमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकले होते. 2015 साली केरळमधील स्पर्धेत प्रल्हाद धावसकर, तर 2022 मध्ये गुजरातमधील स्पर्धेत अरन परेरा त्याचा सहकारी होता. 2023 मधील गोव्यातील स्पर्धेत बीच व्हॉलिबॉल खेळ ऐनवेळी बाहेर पडल्यामुळे गोव्यातील खेळाडूंची संधी हुकली होती.