भाजप अध्यक्षपदी तावडेंच्या निवडीचे संकेत:उत्तर प्रदेश, बिहार केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती; यापूर्वी अमित शाह, नड्डा यांच्यावर ही जबाबदारी
18 hours ago
2
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ विद्यमान सरचिटणीस विनाेद तावडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी निवड करून पक्षश्रेष्ठींनी तसे संकेत दिल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचीही पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली होती. त्यामुळे तावडेंची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी त्या दृष्टीने संकेत दिल्याचे मानले जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले असून ही निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहे. आधी भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्य शाखेच्या समन्वयासाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी नालासोपारा येथील तथाकथित पैसे वाटपाच्या आरोपांमुळे तावडे देशभर चर्चेत आले. पण राज्यात देदीप्यमान यश मिळाल्याने तावडे यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी दिल्लीत होणार कार्यशाळा मंडळ, जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची कालमर्यादा निश्चित केली जाईल. जानेवारीअखेरीस प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील, असे मानले जात आहे. मंडळ, जिल्हाध्यक्षांची डिसेंबर महिन्यात होणार निवडणूक आतापर्यंत देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या आणि आता मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरातील भाजप मंडळ अध्यक्षांची निवडणूक १५ डिसेंबरपर्यंत तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक ३० डिसेंबरपर्यंत होणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)