Published on
:
18 Jan 2025, 10:55 am
Updated on
:
18 Jan 2025, 10:55 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार याबद्दल त्यांचे मत सांगितले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून हायब्रिड मॉडेलच्या धर्तीवर होणार आहे. ज्या अंतर्गत त्याचे सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवले जातील. पाकिस्तान या स्पर्धेचा गतविजेता आहे, त्यांनी 2017 मध्ये विजेतेपद जिंकले होते.
Champions Trophy | यजमान पदाचा फायदा होणार
मागील झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. 23 फेब्रुवारी रोजी गट फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील. यावर गावस्कर यांनी मात्र मान्य केले की यजमान म्हणून पाकिस्तानचा वरचष्मा आहे. गावस्कर यांनी एका क्रीडा वाहिनीला सांगितले की, जेतेपदाच्या दावेदाराचा टॅग घरचा संघ पाकिस्तानकडे जाईल कारण घरच्या परिस्थितीत कोणत्याही संघाला हरवणे सोपे नाही. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला, पण त्याआधी संघाने सलग 10 सामने जिंकले होते, त्यामुळे मला वाटते की 'पाकिस्तान' चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा दावेदार आहे.
Champions Trophy | दुबईत वेगवान गोलंदाजांना मदत
दरम्यान, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की दुबईमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, त्यामुळे निवडकर्ते वेगवान गोलंदाजांना महत्त्व देऊ शकतात. इरफान म्हणाला, जर आपण दुबई स्टेडियमबद्दल बोललो तर तिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही खूप उसळी मिळते आणि निवडकर्ते संघ निवडताना हे लक्षात ठेवतील.
Champions Trophy | भारत-पाकिस्तान एकाच गटात समाविष्ट
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ सहभागी होतील आणि त्यांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट टप्प्यात 12 सामने खेळवले जाणार आहेत. या नंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत आणि दोघांमधील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळला जाईल. भारत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल आणि त्यानंतर 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.