मंत्रालयाची सुरक्षा मंत्र्यांकडूनच धाब्यावर, नरहरी झिरवाळ यांची कार्यकर्त्यांसह घुसखोरी

3 hours ago 2

नव्याने सुरू केलेल्या फेशिअल रेकेग्निशन सिस्टीममुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करणे कठीण झाले असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून आज सुरक्षा व्यवस्थेचे नियम धाब्यावर बसवले गेले. पन्नास-साठ कार्यकर्त्यांना घेऊन नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या व्हीव्हीआयपी गेटमधून थेट प्रवेश केला. गेटवरील पोलिसांनी या प्रवेशावर आक्षेप घेतला, पण मंत्र्यांनी दादागिरी करीत सर्व कार्यकर्त्यांना आत प्रवेश मिळवून दिल्याचे दिसून आले.

मंत्रालयात सध्या नवीन फेशिअल रेकेग्निशन सिस्टीम आणली आहे. त्यामुळे आता केवळ पास व्हिजिटर्सना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. व्हिजिटर्सना तर आरएफआयडी कार्ड दिली जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता मंत्रालयात प्रवेश करणे कठीण होत जाणार आहे, पण महायुती सरकारमधील मंत्रीच सुरक्षा व्यवस्थेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मंत्रालयात प्रवेश करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दुपारी 4 च्या सुमारास पन्नास-साठ कार्यकर्त्यांना घेऊन मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. या गेटमधून फक्त मंत्र्यांना प्रवेश मिळतो, पण सर्व कार्यकर्त्यांना घेऊन झिरवाळ गेटवर आले. वास्तविक जनता जनार्दन गेटवरून प्रवेश पास काढून व्हिजिटर्सना प्रवेश घ्यावा लागतो, पण झिरवाळ गेटवर स्वतः उभे राहिले आणि एकामागोमाग एक कार्यकर्त्यांना प्रवेश मिळवून दिला.

केवळ रजिस्टरमध्ये नोंद केली. एका कार्यकर्त्याचे नाव टाकून सोबत सहा कार्यकर्ते असे नमूद करून प्रवेश मिळवला. इतरांनीही तोच कित्ता गिरवला. मोजक्याच कार्यकर्त्यांची फक्त नोंदवहीत नोंद झाली. मंत्रालयात प्रवेश करताना सोबतच्या पिशव्या बॅगा स्पॅन न करता प्रवेश घेतला. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला आहे. नरहरी झिरवाळ हे प्रत्येक वेळेस अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना घेऊन थेट मंत्रालयात प्रवेश करतात. पोलिसांनी आक्षेप घेतला तर तुझी बदली करून टाकेन अशी धमकी देतात असे पोलीस खासगीत सांगतात. महायुती सरकारमधील अनेक मंत्री कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन अशाच प्रकारे मंत्रालयात प्रवेश करत असल्याचे दिसून आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article