महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राशिवडेतील मल्लांचे यशfile photo
Published on
:
03 Feb 2025, 7:11 am
Updated on
:
03 Feb 2025, 7:11 am
राशिवडे : अहिल्या नगर येथे संपन्न झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ७० किलो वजन गटामध्ये राशिवडे येथील हनुमान तालीम कुस्ती संकुलचा मल्ल सौरभ अशोक पाटील याने सुवर्णपदक मिळवत बुलेटचा मानकरी ठरला. तर ९२ किलो वजनगटामध्ये पै. श्रेयस राहुल गाठ यानेही सुवर्णपदक मिळवत बुलेटचा मानकरी ठरला.
हनुमान संकुलाच्या दहा मल्लांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये ६१ किलो गटामध्ये स्वरूप शिवाजी जाधव याने रौप्य पदक मिळवत स्प्लेंडर गाडीचा मानकरी ठरला, तर ७० किलो गटामध्ये कुलदीप बापूसो पाटील याने कास्यपदक मिळवत सोन्याच्या अंगठी मिळवली. ९७ किलो वजनगटामध्ये ऋतुराज शेटके यांने कास्यपदक पटकावत सोन्याच्या अंगठीचा मानकरी ठरला. या मल्लांना संकुलाचे प्रशिक्षक वस्ताद सागर चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.