महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण हे 23 तारखेनंतर ठरेल:26 तारखेला सत्ता स्थापन करणार; आमच्या 160 ते 165 जागां निवडून येतील- संजय राऊत

2 hours ago 1
महाविकास आघाडी 26 तारखेला सत्तेत येईल. आम्ही 23 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो, आणि 26 तारखेला सरकार स्थापन करू असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही 160 ते 165 जागा जिंकणार आहोत. पोलवर कुणी विश्वास ठेवू नये. हे सर्व भाजप आणि शिंदेंचे फार मोठे षडयंत्र आहे. आजपर्यंत कोणते पोल मोठे ठरले हा संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही राऊतांनी लागावला आहे. महायुतीने यंत्रणाचा गैरफायदा घेतला संजय राऊत म्हणाले की, महायुतीच्या लोकांनी यंत्रणांचा गैरफायदा घेत पैशाचा पाऊस पाडला. पण ही निवडणूक पैशापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान यावर लढली गेली आहे. आम्हाला खात्री आहे, की जनतेचे पैशाच्या प्रवाहात न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केले आहे. आम्ही महाराष्ट्र हवे की अदानी राष्ट्र हवे असे कायम सांगत आलो. ट्रम्प यांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. गौतम अदानी यांनी सगळ्या जागा आणि टेंडर मिळवले. आम्ही सुद्धा ट्रम्पसारखे अदानींवर कारवाई करणार म्हणून या निवडणुकीत पैसा औतण्यात आला. आम्हाला बहूमत मिळेल संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मी 23 तारखेला 10-11 वाजता मी तुम्हाला सांगेल. मी एवढंच सांगेल की ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार, आणि काँग्रेसला मिळून सत्ता स्थापनेइतके मतदान पडेल असा विश्वास ही राऊतांनी व्यक्त केला. लोकशाहीतील मतदान हे गुप्त असते, लोकं खूलेपणाणे सांगू शकत नाही. पोलचे काही खरे नाही संजय राऊत म्हणाले की, पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार दाखवले जात होते. हरियाणाील परिस्थिती वेगळी दिसत होती. पण तिथे काय झाले. आता 23 तारखेला 10 ते 11 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्रीपदावर निर्णय 23 तारखेला नाना पटोले यांचे काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे, या वक्तव्यावर खासदार राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर निर्णय होईल. काँग्रेस नेतृत्वात सरकार स्थापन होईल असे मी मानत नाही. नाना पटोले यांनी जरा असे म्हटले असेल किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर आपण मुख्यमंत्री होणार असे सांगितले असेल तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, खरगे यांनी तसे जाहीर करायला हवे. 2 हजार कोटी खर्च केले संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ढब्बा लावला आहे. महाराष्ट्रात धारावी ते विमानतळ सर्व त्यांनी देण्यात आले, हे कसे घडले तर अदानी यांनी 2000 कोटी रुपये निवडणुकीसाठी लावले आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून 2000 कोटीपेक्षा जास्त पैसा निवडणुकीत खर्च करण्यात आला आहे. तो पूर्ण पैसा अदानींचा आहे, ही लाच असून त्या प्रकरणीच अमेरिकेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. कोण संजय शिरसाट? संजय राऊत म्हणाले की, संजय शिरसाट कोण आहे, त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहे. केदार दिघेंवर गुन्हा दाखल केला पण महायुतीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला नाही, तुमचे दिघेंवर हेच प्रेम आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुहास कांदेंच्या वक्तव्यावर पोलिस, गृहमंत्री, यांची काही जबाबदारी आहे का नाही असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article