शिवरत्न’ बंगला येथे झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना आ. उत्तमराव जानकर.Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:45 am
अकलूज : माळशिरस विधानसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे सुमारे 13 हजार 148 मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. यामध्ये टपाली मतांचाही समावेश होता.
मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक एकत्र आले. यामुळे माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. शनिवारी अकलूजच्या शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी पहिल्या फेरीत उत्तमराव जानकर यांनी राम सातपुते यांच्यावर 19 मतांची आघाडी घेतली होती. तालुक्याच्या पश्चिम भागातून भाजपचे राम सातपुते यांनी दुसर्या फेरीपासूनच उत्तमराव जानकर यांच्यावर मताधिक्य घेण्यास सुरुवात केली.
अकराव्या फेरीअखेर राम सातपुते हे 8530 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर त्यांचे मताधिक्य हळूहळू घटत गेले. मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या तालुक्याचा पूर्व भाग सुरू होताच 17 व्या फेरीअखेर उत्तमराव जानकर यांनी 90 मतांची आघाडी घेतली व 17 व्या फेरीपासून अखेरच्या 25 व्या फेरीपर्यंत उत्तमराव जानकर आघाडीवर राहिले. अखेरच्या 25 व्या फेरीनंतर उत्तमराव जानकर यांनी 12265 मतांची आघाडी घेतली व आपला विजय निश्चित केला. माळशिरस तालुक्यात एकूण दोन लाख 40 हजार 851 मतदान झाले. यामध्ये उत्तमराव जानकर यांना एक लाख 20 हजार 322 मते, तर भाजपचे राम सातपुते यांना एक लाख आठ हजार 57 मते मिळाली. या मतमोजणीत बसपाचे सूरज सरतापे यांना 1308, ‘वंचित’चे राजकुमार यांना 2246, रासपाचे डॉ. सूरज लोखंडे 421, अपक्ष अरुण धाईंजे 547, कुमार लोंढे 200, दादा लोखंडे 308, मनोज कुमार सुरवसे 257, रमेश नामदास 2953, सुधीर पोळ 608 व नोटा 1855, अशी एकूण इतर 10 हजार 540 मते इतर उमेदवारांना मिळाली आहेत.