मित्राकडून छळ; वैमानिक तरुणीची मुंबईत आत्महत्या:हत्या करून आत्महत्येचा बनाव : कुटुंबीयांचा आरोप

18 hours ago 2
एअर इंडियाच्या सृष्टी विशाल तुली (२५) या वैमानिक तरुणीने मित्राच्या छळाला कंटाळून अंधेरी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पवई पोलिसांनी तिचा २७ वर्षीय मित्र आदित्य पंडितला अटक केली आहे. दरम्यान, सृष्टीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आदित्यने तिची हत्या करून आत्महत्या दाखवण्याचा बनाव केला आहे. त्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आदित्य पंडितनेही वैमानिक बनण्यासाठी परीक्षा दिली होती. पण तो अपयशी ठरला होता. त्यामुळे तो तिच्यावर संतापत होता. रविवारी सृष्टी गोरखपूर या तिच्या मूळ गावाहून मुंबईत परतल्यावर तिचे आदित्यशी जोरदार भांडण झाले. पंडित रात्री १ वाजता दिल्लीला निघाला. तेव्हा सृष्टीने त्याला मोबाइल करून ती आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे तो अर्ध्या रस्त्यातून तिच्या घरी आला, पण दार आतून बंद होते. त्याने किल्लीवाल्याला बोलावून दरवाजा उघडला तेव्हा तिने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. सृष्टीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आदित्य अनेकदा सर्वांदेखत तिच्याशी जोरदार भांडण करायचा. तिच्या खासगी आयुष्यावर नियंत्रणाचा प्रयत्न करायचा. सृष्टीला लष्करी वारसा सृष्टी गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिचे आजोबा नरेंद्रकुमार तुली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते. उपजत लढाऊ बाणा असलेली आमची मुलगी आत्महत्या कशी करू शकते, असा तिच्या कुटुंबीयांचा सवाल आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article