मुंबई-मडगाव तेजसच्या इंजिनमध्ये बिघाड

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Jan 2025, 12:50 am

Updated on

22 Jan 2025, 12:50 am

रत्नागिरी : मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान दरम्यान धावणार्‍या तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या मार्गावरील सहा ते सात गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. इंजिन बिघाड झालेली तेजस एक्स्प्रेसनंतर डिझेल इंजिन जोडून घटनास्थळापासून पुढे मार्गस्थ करण्यात आली. सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी मुंबईतून गोव्याच्या दिशेने धावत असताना उक्षी ते रत्नागिरी दरम्यान करबुडे येथे विद्युत इंजिनमध्ये अचानक बिघाड निर्माण झाला.

याची माहिती तातडीने ‘कोरे’ नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच रत्नागिरी येथून ईमर्जन्सी व्हॅन करबुडेकडे रवाना झाली. रत्नागिरी येथून पर्यायी डिझेल इंजिन पाठवून इंजिन दोष निर्माण झालेली तेजस रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

दरम्यान, तेजस एक्स्प्रेस मुंबई - मडगाव मार्गावर धावत असतानाच अचानक विद्युत इंजिन बिघडल्याने ही गाडी तब्बल तासभर रखडली. याचबरोबर यावेळी मार्गावरुन धावणार्‍या अप मांडवी एक्स्प्रेससह सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांना विलंबाचा फटका बसला. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील तेजस एक्स्प्रेस जवळपास एक तास मडगावला उशिरा पोहचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article