कोल्हापूर : राजेंद्रनगरवासीयांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येणार्या काळात येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच येथील आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी केले.
राजेंद्रनगर येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. पद नसताना देखील मी लोकांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे, असे ते म्हणाले. दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधायक योजनांच्या माध्यमातून अंत्योदय घटकातील नागरिकांसाठी काम केले आहे. सर्वांना सर्वोत्तम सुविधा पुरवून देशाला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करत त्यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला संग्राम निकम, माजी नगरसेवक रूपाराणी निकम, महेश वासुदेव, आरपीआयचे शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, आरपीआयच्या कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गुणवंत नागटिळे, विक्रम बांदिवडेकर, अजिंक्य जाधव, बंडा किल्लेदार, महंमद मकानदार, पल्लवी किल्लेदार, संपदा काळे, आरपीआयचे शहराध्यक्ष (कवाडे गट) सोमनाथ घोडेराव, दत्ता लोखंडे, प्रसाद पाटोळे, महादेव बिरजे, नामदेव नागटिळे, बंकट सूर्यवंशी यांच्यासह राजेंद्रनगरमधील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यावर उतरावे लागले तरी...
दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय पूर्णत्वास नेण्याचा निर्धार मी केला आहे. काही भागातील नागरिकांना कार्ड करून दिले आहे. आता उर्वरीत नागरिकांची प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी मी काम करणार आहे. यासाठी मला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असे महाडिक म्हणाले