गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. ती केवळ नदी मानली जात नाही तर तिची पूजाही केली जाते. गंगेचे पाणी शिंपडल्यानेच एखादी जागा किंवा व्यक्ती पवित्र होते अशी धार्मिक धारण आहे. त्यामुळेच गंगेचे पाणी वेगवेगळ्या घाटावरून आणून घरात ठेवले जाते. गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ केली जाते. तसेच पूजा किंवा यज्ञ करताना काही थेंब गंगेच्या पाण्याचे घरात शिंपडले जातात. पण काही लोक यमुनेचे पाणी घरात ठेवतात. यमुना नदीच्या काठावर पूजा करतात आणि त्याचे पाणी घरी आणतात. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न येतो की यमुना नदीचे पाणी गंगा नदीच्या पाण्यासारखे पवित्र आहे का? आणि ते गंगेच्या पाण्याप्रमाणे घरात ठेवता येऊ शकतो का?
यमुना नदी बद्दलची मान्यता
भारतातील अनेक नद्या अतिशय पवित्र मानल्या जातात. त्यापैकी गंगा, यमुना नदीचे देखील नाव आहे. यमुना नदी पश्चिम हिमालयातून उगम पावते. तसेच ही नदी उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर वाहते. यमुना नदी दिल्ली, आग्रा आणि प्रयागराज मधून जाते. प्रयागराज मध्ये यमुना नदी गंगा नदीला मिळते.
प्रयागराज मध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम होतो आणि त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. गंगा नदीप्रमाणेच यमुना नदीची ही पूजा केली जाते आणि गंगा आरतीप्रमाणे यमुना नदीची आरती अनेक घाटांवर केली जाते. असे मानले जाते की यामुळे पवित्रता येते आणि अनेक पापे नष्ट होतात.
शास्त्रामध्ये काय आहे यमुना नदीचे स्थान
धार्मिक शास्त्रानुसार यमुना नदीचे पाणी घरी आणणे अशुभ मानले जाते. याचे कारण म्हणजे यमुना नदी श्रीकृष्णाची पटरानी मानल्या जाते. पौराणिक कथेनुसार यमुना नदीला श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले होते कि ती सदैव त्यांच्या चरणी राहील. त्यामुळे यमुना नदीचे पाणी घरात ठेवणे निषिद्ध मानले जाते.
यमुना नदीमध्ये यमाचा वास आहे
धार्मिक श्रद्धेनुसार यमुना नदी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या चरण कमलांच्या निवासाशिवाय कुठेही थांबत नाही. याशिवाय यमुनेचे पाणी घरात न ठेवण्यामागचे आणखीन एक मोठे कारण म्हणजे यमराज यमुना नदीत वास करतात असे मानले जाते. शास्त्रानुसार यमराज हे यमुना नदीचा भाऊ आहे. असे मानले जाते की यमुनेचे पाणी घरात ठेवणे म्हणजे यमाला घरात स्थान देण्यासारखे आहे. यमराज यमुना नदीचे भाऊ असल्याकारणाने यमुना नदीमध्ये स्नान केल्याने यमराज त्या व्यक्तीला त्रास देत नाही.
यमुना नदीचे पाणी घरात न ठेवण्याचे इतर कारणे
- यमुना नदीत प्रदूषणाची समस्या आहे.
- घरगुती, औद्योगिक कचरा आणि शेतीचा कचरा यमुना नदीमध्ये आढळतो.
- यमुना नदीचे पाणी पिऊन लोक आजारी पडू शकता.
- यमुना नदीत स्नान करणे देखील सुरक्षित मानले जात नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)