राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शहरातील संघांचा जास्त सहभाग:17 पैकी दहा नाट्यसंघ शहरी, तर सात संघ ग्रामीण भागातून
2 hours ago
1
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्रावर एकूण १७ नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत. मागील वर्षी १५ नाट्यसंघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा त्यात दोनने वाढ झाली आहे. स्पर्धेच्या सम्वयकपदी सागर मेहेत्रे तर सहसमन्वयकपदी जालिंदर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दररोज एक नाट्यप्रयोग होणार असून वेळ रोज सायंकाळी ८ वाजता प्रयोग सुरु होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. राज्य नाट्य स्पर्धेचे अहमदनगर केंद्राचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे. २५ नोव्हेंबर : जन पळभर म्हणतील टिंब टिंब (विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट कोपरगाव), २६ नोव्हेंबर : ती, तिचा दादला आणि मधला (वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर), २७ नोव्हेंबर : प्रियांका आणि दोन चोर (चिचोंडी पाटील, अहिल्यानगर), २९ नोव्हेंबर : ब्लॅक अँड व्हाईट (स्माईल फौंडेशन, नगर), ३० नोंव्हेंबर : कधी आंबट कधी गोड (संकल्पना फौंडेशन, कोपरगाव), १ डिसेंबर : पंचमवेद (सप्तरंग थिएटर्स, नगर). २ डिसेंबर : राजर्षी (संगम ग्रामविकास मंडळ, संगमनेर), ३ डिसेंबर : दुसरा अंक (समर्थ युवा प्रतिष्ठान, घोडेगाव), ४ डिसेंबर : मर्म (रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान, नगर), ५ डिसेंबर : उत्खनन (प्रवरा थिएटर्स व क्रिएटिव्ह क्रिएशन्स, शेवगाव), ६ डिसेंबर : कन्यादान (नाट्यआराधना, नगर), ८ डिसेंबर : आता कसं करु (नाट्यमल्हार, नगर), ९ डिसेंबर : रिप्लसमेंट (नटेश्वर कला क्रीडा संस्था, नगर). १० डिसेंबर : बस्स इतकच (कर्णेज अकॅडमी, श्रीरामपूर), ११ डिसेंबर : अमाशी (कल्पड्रम फौंडेशन, नगर), १२ डिसेंबर : झिम पोरी झिम्म (जय बजरंग युवा प्रतिष्ठान, नगर), १३ डिसेंबर : आकाशदिठी (केक फौंडेशन, नगर). स्पर्धा लांबणीवर सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर च्या पंधरवड्यानंतर सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा यंदा आठवडाभर उशिराने सुरु होत आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर ही स्पर्धा सुरु होणार आहे. नव्या संघांचा समावेश हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १७ नाट्यसंघांपैकी जवळपास दहाहून अधिक नाट्यसंघ सातत्याने सहभाग घेतात. परंतु, ३ नाट्यसंघ यंदा नव्यानेच सहभागी होत आहेत. त्यामुळे नव्या नाट्यसंहिता व नवीन नाटके पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)