रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेंना देऊन मुंबई मिळवण्याची भाजपची खेळी, गोगावले-तटकरे वादाचा

3 hours ago 2

रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. पालकमंत्रीपद न मिळाल्याने गोगावले तर मिळालेले पद गमावल्याने आदिती तटकरे नाराज आहेत. या वादाचा फायदा उठवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे. एकनाथ शिंदे यांना रायगडचे पालकमंत्री देऊन त्यांच्याकडून मुंबईचे पालकमंत्रीपद काढून घ्यायचे आणि तिथे आपल्या मंत्र्याची वर्णी लावायची, असे षड्यंत्र भाजपमध्ये शिजतेय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. राज्याप्रमाणे मुंबई महापालिकेतही बहुमत मिळवण्याची भाजपची आसुरी इच्छा लपलेली नाही. मुंबई शहर जिह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. महापालिका मिळवायची तर पालकमंत्री आपलेच पाहिजेत या उद्देशाने मुंबई शहरचे पालकमंत्रीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

अजित पवार गटाचा राग शिंदे गटाकडे वळवण्याचा प्रयत्न

गोगावले-तटकरे वाद मिटवण्याचे निमित्त सांगून रायगडचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना द्यायचे म्हणजे अजित पवार गटाचा राग शिंदेंकडे वळवता येईल आणि दुसरीकडे आदिती तटकरे यांना मुंबई शहरच्या पालकमंत्रीपदावर नेमतो सांगून त्यांची सहानुभूती मिळवायची असे भाजपचे प्रयत्न आहेत. आदिती तटकरे यांना मुंबई शहरच्या पालकमंत्रीपदी नेमले की साहजिकच मिंधे गट नाराज होणार, मग त्यांना खूश करण्यासाठी तिथे भाजपचाच मंत्री नेमायचा किंबहुना सह-पालकमंत्र्याला पालकमंत्री बनवून त्याचीही नाराजी दूर करायची असा एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे षड्यंत्र भाजपने रचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article