राष्ट्रीय पोषण महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी:हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

1 hour ago 1
राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत हिंगोली जिल्हयाने ११९७ अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल १८ लाख नोंदी घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे. राज्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून सप्टेंबर महिन्यात पोषण माह राबविण्यात आला. यामध्ये १ लाख अंगणवाड्यांमधून विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी घेण्याच्या सुचना आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. या उपक्रमात अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्यासोबतच गरोदर व स्तनदामातांसाठी मार्गदर्शन, दररोज नवीन रेसीपीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार देणे यासह इतर उपक्रमांचा समावेश होता. दरम्यान, हिंगोली जिल्हयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी सहा प्रकल्पांमधील अंगणवाड्यांमधून उपक्रम राबविण्यास सुरवात केली होती. हिंगोली जिल्हयातील ११९७ अंगणवाड्यंमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल १८ लाख उपक्रमांची ऑनलाईन नोंद घेतली आहे. सर्वात जास्त उपक्रम व नोंदी घेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. मुंबई येथील भायखळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात शुक्रवारी ता. ११ महिला व बालविका मंत्री अदिती तटकरे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा सत्कार केला जाणार आहे. महिला बालकल्याण विभागाची यापुर्वीही कामगिरी सरस जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने यापुर्वीही आयुक्तालयाकडून दिलेल्या सुचनांनुसार कामे करून सरस कामगिरी केली आहे. आधार व्हेरीफिकेशन, एकसमान रंगरंगोटी, धुरमुक्त अंगणवाडी, पोषण ट्रॅकरमध्येही यापुर्वी राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article