बॉलिवूडमध्ये अशा अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या दुनियेत नशीब आजमावलं. पण काहींचे चित्रपट चालले आणि काहींना हवं तस यश मिळालं नाही. या कलाकारांमध्ये अभिनेत्रींची मात्र बरीच चर्चा होते. काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीत आल्या आल्याच पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली पण त्यानंतर मात्र त्यांचे चित्रपट फारसे चालले नाही. त्यानंतर त्या या फिल्मी दुनियेतून जशा गायबच झाल्या.
पण या अभिनेत्रींची लोकप्रियता आजही तशीच आहे. एवढच नाही तर या अभिनेत्रींनी बॉलिवूड करिअरसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
बोल्ड सीनमुळे चर्चेत
अशीच एक अभिनेत्री जिने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, एवढच नाही तर घरच्यांचा विरोध पत्करून आपलं फिल्मी करिअर घडवलं आहे. जिच्या पहिल्याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. ही अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत.
मल्लिका शेरावतला ‘मर्डर’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील गाण्यांपासून ते तिच्या बोल्ड सीनपर्यंत सर्वांचीच चर्चा झाली. एवढच नाही तर मल्लिता तिच्या खासगी आयुष्यामुळेही तेवढीच चर्चेत राहिली आहे.
वडिलांनी घराबाहेर काढलं
मल्लिकाने जेव्हा मोठ्या पडद्यावर अशा भूमिका साकारण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. तिला चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. मात्र मल्लिका तिच्या निर्णयावर ठाम असल्याने तिच्या वडिलांनी रागाने तिला घराबाहेर काढलं. यानंतर तिने आईचे नाव धारण करून इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झालं तर 48 वर्षांची मल्लिका सध्या सिंगल लाइफ जगत आहे. पण रिपोर्ट्सनुसार, तिने 1997 मध्ये पायलट करण सिंग गिलसोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचे लग्न केवळ एक वर्ष टिकलं आणि दोघांचा घटस्फोट झाला.
एका चित्रपटामुळे रातोरात स्टार
24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणामध्ये जन्मलेल्या मल्लिका शेरावतने 2002 मध्ये ‘जीना सिरफ मेरे लिए’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिला खरी ओळख ‘मर्डर’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात अनेक नवीन बोल्ड सीन्स दिले, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.
मल्लिकाने तिच्या 23 वर्षांच्या करिअरमध्ये 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात ‘ख्वाहिश’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘हिस’ आणि ‘डर्टी पॉलिटिक्स’ यांचा समावेश आहे.
मात्र काही काळानंतर, तिचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, ज्यामुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला. हळुहळू ती मुख्य पात्रांपासून साईड रोल आणि नंतर फक्त आयटम साँगपर्यंतच मर्यादित राहिली.
170 कोटींची मालकीण
तिने गेल्या वर्षी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले, परंतु या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण तिच्या म. आजही तिचे चाहते तिला खूप पसंत करतात.
तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असले तरी ती आजही करोडो रुपयांची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 170 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे आलिशान घर आणि गाड्या आहेत.