लांब पल्ल्याच्या फेऱ्या दोन दिवस रद्द:एसटी निवडणूक व्यवस्थेत, जिल्ह्याअंतर्गत वाहतूक सुरू
1 hour ago
1
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थेअंतर्गत मतदान केंद्रांवर कर्मचारी, मतपेट्या पोहोचवण्यासाठी मंगळवारी १९ आणि बुधवारी २० नोव्हेंबर अशा दोन दिवसांसाठी २८९ गाड्या भाडेतत्त्वावर मागण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाकडे एसटी बसचा प्रचंड तुटवडा आहे. त्यात निवडणूक विभागाची गरज भागवण्यासाठी एसटी महामंडळाकडून बाहेरून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन दिवस प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित होणार आहे. १९, २० एप्रिल दोन दिवसांसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अकोलाच्या एस. टी. विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे. मुख्य म्हणजे वाशीम जिल्ह्यासाठी अकोला विभागातूनच गाड्या जाणार आहेत. वाशीम, अकोल्यात २७९ गाड्या व्यवस्थेमध्ये असणार आहेत. पूर्वी ही मागणी अधिक गाड्यांची होती. यामध्ये कमी करण्यात आली. मागणी पूर्ण करण्यासाठी अन्य मंडळातून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर वेळेत कर्मचारी, मतदानाच्या पेट्या, व्हीव्हीपॅट मशीन तसेच पोलिसांना त्या प्रत्येक केंद्रावर पोहोचवणे तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षितपणे घेऊन जाणे या सर्व प्रक्रियेसाठी एसटी विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे. अकोला परिवहन विभागातील ९ आगारांतून या गाड्या गरजेनुसार सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन दिवस प्रवासी वाहतूक विस्कळीत आहे. गाड्यांच्या तुटवड्याचा प्रवाशांना बसणार फटका अकोला विभागाकडे ९ आगार मिळून ३२० गाड्या आहेत. यापैकी ३०५ गाड्या नियमित मार्गावर, तर १५ ते २० गाड्या वर्कशॉपला दुरुस्तीला असतात. प्रत्यक्ष उपलब्ध होणाऱ्या ३०५ गाड्यांपैकी २८ शिवशाही व २ हिरकणी गाड्या आहेत. जिल्ह्यात वाहतुकीसाठी गाड्या नसल्याने नागपूर विभागातून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. या गाड्या तालुकास्तरावर सेवा देणार आहे. दिवसभरात फक्त एक फेरी अमरावती सोडण्यात येणार आहे. गाड्यांच्या तुटवड्याचा प्रवाशांना फटका बसणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)