Published on
:
21 Nov 2024, 2:26 pm
Updated on
:
21 Nov 2024, 2:26 pm
वर्धा : स्थानिक मुख्य बाजारपेठेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी दरोडा घालून ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. दरोड्याचा प्रयत्न करणार्यांना पकडताना दुकानातील तीन कर्मचार्यांना दुखापत झाली. आरोपींकडे स्प्रे सोबत धारदार शस्त्र असल्याची माहिती सांगण्यात येते. गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी १२.१५ वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.
शहरातील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्समध्ये दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. दरम्यान, १२.१५ वाजताच्या सुमारास दोनजण दुकानात आले. एक युवती आणि एक युवती असे दोघे काही वेळ दागिणे पाहत होते. दरम्यान, अचानक दोघांनीही दुकानात दरोड्याचा प्रयत्न केला. ही बाब निदर्शनास येताच कर्मचार्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत तीन कर्मचार्यांना दुखापत झाली. दुखापत होऊनही कर्मचार्यांनी त्यांना पकडून ठेवले. दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. आरोपींनी काही दिवसांपूर्वी रेकी केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. चोरट्यांजवळ धारदार शस्त्र आणि स्पे्र असल्याचे सांगण्यात आले. दिवसाढवळ्या मुख्य बाजारपेठेत वर्दळ असताना ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. यामुळे दुकानापुढे मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.