नवी दिल्ली : प्रचार सभेनंतर दिल्लीतील मतदारांसह गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. Pudhari File Photo
Published on
:
03 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:42 am
पणजी : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या प्रचारासाठी जोरदार आघाडी घेतली आहे. ठिकठिकाणी जाहीर सभांसह कोपरा बैठका, भेटीगाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला आहे. याचवेळी ते विकसित भारतासाठी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
राजधानी दिल्लीची विधानसभा निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली असून देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रभावशाली नेत्यांनी दिल्लीत ठिय्या मांडला असून भाजपच्या प्रचारात सहभाग नोंदवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही ठिकठिकाणी कोपरा बैठकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग नोंदवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी करोलबाग येथील प्रसिद्ध मराठा मित्र मंडळाच्या सत्यनारायण पूजेमध्ये सहभाग नोंदवून आशीर्वाद घेत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे राजेंद्रनगर विधानसभा क्षेत्रात सरस्वती संस्कृती सदनामध्ये बैठक घेत कोकणी भाषिक आणि सारस्वत समाजातील नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. दिल्लीतील गोंयकारांचो एकवट यांच्या बैठकीला हजेरी लावत भाजपसोबत एकत्रित येण्याचे आवाहन केले. एकूणच भाजपने या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार निवडून कसा येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.