विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ज्ञानविकास प्राथमिक शाळा जिल्ह्यात अव्वल:वाहतूक व दळणवळण संकल्पना राज्यस्तरासाठी पात्र

1 day ago 1
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (पुणे) यांच्या आदेशाने शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय हेकथॉन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील वरात विद्यामंदिरात घेण्यात आली. शाळा स्तरावर प्रयोगाची मांडणी करत, ऑनलाइन प्रयोगाचे सादरीकरण, स्पष्टीकरण या स्पर्धेत देण्यात आले होते. जिल्हाभरातून १०० प्रयोगांचा यात सहभाग होता. यात भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सोहम शिंदे, यश अक्कर या विद्यार्थ्यांचा वाहतूक व दळणवळण हा प्रयोग प्रथम विजेता ठरला. याची राज्यस्तरावर निवड जाहीर झाली. या प्रयोगात अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल, अपघात झालाच तर लगेच आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल, तेही स्वस्त दरात. यासाठी विद्यार्थ्यांनी सृजनशीलता, कल्पकता मांडत आदर्श प्रयोगाची मांडणी केली आहे. स्पर्धक म्हणून रवी जाधव, माधुरी दलाल, शेख सलीम यांनी भूमिका बजावली. विजेत्या विद्यार्थ्यांचे हेकथॉन उपक्रमाचे नोडल अधिकारी प्राचार्या सानवी देशमुख, डॉ. प्रकाश मांटे, अशोक गरुड, एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, योजनेच्या शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर, शिल्पाताई गरुड, डॉ. सोनाली बारहाते, डॉ. माधुरी दलाल, श्रीमती तांदळे, रायभान जाधव, सत्यनारायण मुराडी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article