अजित पवारांच्या निकटवर्तीयाची टेगेगिरी:नागरिकाला मारहाण करत उचलून आदळले, बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
20 hours ago
3
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी एका नागरिकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. पुणे येथील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी विजय रौंदळ नामक नागरिकाला मारहाण केली आहे. जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचे समजते. बाबुराव चांदेरे यांनी या नागरिकाला चापट मारत उचलून आदळल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या मारहाणीत विजय रौंदळ यांच्या डोक्याला तसेच गुडघ्याला जखम झाली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडिओ देखील त्यांच्या एक्सवर पोस्ट केला आहे. बाबुराव चांदेरे हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. जमिनीच्या वादातून बाबुराव चांदेरे यांनी या नागरिकाला मारहाण केली. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी एका रिक्षा चालकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. शनिवारी केलेल्या या माराणीवर पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, जे झाले ते अतिशय चुकीचे आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितले की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)