विरोधक छोट्या मनाचे:त्यांना झालेला विकास दिसत नाही है दुर्दैव- आ. काळे, विरोधकांनी चाळीस वर्षे सत्तेत राहून तालुक्यात काही केले नाही

2 hours ago 1
तीन हजार कोटींच्या निधीतून मतदार संघात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या असून हे सर्व मतदार संघातील जनता अनुभवत आहे. मात्र आपले विरोधक छोट्या मनाचे असल्यामुळे त्यांना झालेला विकास दिसत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून विरोधकांना विकास दाखवून द्यावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व सेल अध्यक्षांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार काळे म्हणाले, या पाच वर्षांत जो काही विकास झाला, तो विकास यापूर्वी कधीच झाला नव्हता. विरोधकांकडे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याची ४० वर्ष सत्ता होती. त्यांना देखील त्या चाळीस वर्षांत एवढा मोठा निधी आणता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मतदार संघातील जनतेला पण माहित आहे. मात्र विरोधकांकडे विकास पाहण्यासाठी मोठं मन नसल्यामुळे त्यांना विकासच दिसत नाही. त्याला आपण काही करू शकत नाही. त्यांची पारंपारिक पद्धत आहे. प्रश्न सोडवायचे नाहीत, त्यावर वर्षानुवर्ष राजकारण करायचे. त्यांच्या राजकारणाची ही पद्धत पाच वर्षात मोडून काढली आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधक कुटनीती वापरून जनतेला काय काय, आश्वासन देतील त्याची कल्पना मी व तुम्ही सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना गाफील राहून चालणार नाही. अतिशय चिकाटीने व संपूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आहेत नवनिर्वाचित पदाधिकारी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कार्याध्यक्ष पंकज पुंगळ, युवक तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, महिला तालुकाध्यक्ष अनिता खालकर, विद्यार्थी कार्याध्यक्ष शुभम शिंदे, युवती तालुका अध्यक्षा वैशाली आभाळे, सेवा दल सेल गणेश जाधव, अल्पसंख्यांक सेल मतीन सय्यद, सामाजिक न्याय सेल यशवंत निकम, डॉक्टर सेल डॉ. आय. के सय्यद यांचा यात समावेश आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article