सावंतवाडी ः महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक केसरकर यांना शुभेच्छा देताना वेळागर येथील भगत कुटुंबीय, बबन बागकर, उदय भगत, प्रीती भगत आदी.pudhar photo
Published on
:
16 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:00 am
सावंतवाडी ः ताज पंचतारांकित हॉटेल भूमिपूजन समारंभादरम्यान वेळागर येथे झालेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, असा दावा सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केला. खरेतर वेळागर ग्रामस्थांमध्ये याबाबत गैरसमज पसरविण्यामागे ‘मविआ’चे उमेदवार राजन तेली यांचा हात होता, असा आरोप त्यांनी केला.
केसरकर म्हणाले, वेळागर ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित 9 हेक्टर जागा सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. मात्र ती जागा नेमकी कोणती? याचा निर्णय काही काळानंतर होणार आहे. तोपर्यंत या परिसरात कोणतेही बांधकाम होणार नाही. त्यामुळे तूर्तास ग्रामस्थांची नाराजी दूर करण्यास यश आले आहे, असा दावा त्यांनी केला. वेळागर येथील ते आंदोलन गैरसमजातून झाले होते. जसा सर्वे नं 39 चा प्रश्न सोडवला तसाच सर्वे नं 29 चाही सोडवू. कोणती जमीन सोडवायची हे निश्चित होईपर्यंत तेथे बांधकाम होणार नाही. दरम्यान स्थानिक होतकरू युवकांना हॉटेेल मॅनेजमेंन्ट व अनुशंगिक कामांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून, अश्या प्रशिक्षित युवकांना ‘ताज’ ग्रुपमध्ये नोकर्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच मी वेळागर मध्ये जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.(Maharashtra assembly poll)
श्री. केसरकर म्हणाले, वेळागर येथील ते आंदोलन गैरसमजातून झाले होते. गैरसमज पसरवण्याचे काम राजन तेलींनी केले. या ग्रामस्थांवरील पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मी मागे घेतले आहेत. जसा सर्वे नं 39 चा प्रश्न सोडवला तसाच सर्वे नं 29 चाही सोडवू. कोणती जमीन सोडवायची हे निश्चित होईपर्यंत कोणतेही बांधकाम होणार नाही याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
भगत कुटुंबीयांकडून दीपक केसरकरांचे आभार
गुन्हे मागे घेतल्याबद्दल वेळागर येथील भगत कुटुंबीयांनी श्री. केसरकर यांचे आभार मानले. माजी पंचायत समिती सदस्य बबन बागकर, उदय भगत, प्रीती भगत, समीर भगत, अशोक भगत, श्याम भगत, सुनील डुबळे, अंकिता भगत, सुनैना भगत आदी उपस्थित होते.