‘शक्तिपीठ’चे भूत मानगुटीवर बसविणारे आबिटकर घरी बसणार

2 hours ago 1

वाघापूर : येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना माजी आमदार के. पी. पाटील व समोर उपस्थित जनसमुदाय.

पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Nov 2024, 1:33 am

Updated on

17 Nov 2024, 1:33 am

गारगोटी : ज्या आमदार आबिटकरांनी राधानगरी मतदार संघातील गोरगरीब शेतकर्‍यांच्या मानगुटीवर शक्तिपीठ महामार्गाचे भूत बसविले, त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखविणार, असा घणाघात माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला.

शक्तिपीठ महामार्गाचे श्रेय घेण्यात आधी सर्वात आघाडीवर असणार्‍या या आमदार महोदयांनी शेतकर्‍यांचा विरोध पाहून लगेचच यू टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला. वाघापूर (ता. भुदरगड) येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्या झाल्या भलामोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि याची मंजुरी आपणच घेतल्याचे ऊर बडवून सांगणारे आमदार आबिटकर शेतकर्‍यांचा उद्रेक पाहून, मात्र तोच डिजिटल बोर्ड उतरवून घेत ‘मी तुमच्या बाजूने’ असा केविलवाणा पवित्रा घेताना या मतदारसंघाने पाहिले आहे. या शक्तिपीठ महामार्गासाठी मतदार संघातील अनेक शेतकर्‍यांची जमीन संपादित केली जाणार असून, शेतकर्‍यांवर भूमिहीन व्हायची वेळ येणार आहे. हे टक्केवारीत आणि भागीदारीत बक्कळ पैसे कमवून जमिनी घेत सुटलेत आणि अशा महामार्गामुळे इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती आहे. या महामार्गावरून माझ्या गोरगरीब शेतकर्‍यांची सायकल, बैलगाडी जाणार नसून, तुमच्या महागड्या गाड्या फिरण्यासाठी आणि महामार्गाच्या पैशातून कमिशन उकळण्यासाठी जर हा महामार्ग तुम्ही करीत असाल, तर मी स्वतः विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या बाजूने दंड थोपटणारच. बापूसाहेब आरडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सचिन धैर्यशील देसाई-घोरपडे, संग्राम देसाई, पंडितराव केणे, बाळासाहेब गुरव आदींची भाषणे झाली.

कोटींची कामे कागदावर... हा तर नुसता आकड्यांचा खेळ!

विकासकामांसाठी कोटींचा निधी आणल्याचा ढोल बडवणार्‍या आमदारांनी कमिशनचा नाद सोडून कामांच्या दर्जाबाबत दक्षता घेतली असती, तर मतदारसंघात विकासकामे सुस्थितीत दिसली असती. उगाचच मोघमात कोटींची विकासकामे झाले म्हणणार्‍यांची ही कामे कागदावर असून, हा नुसता आकड्यांचा खेळ त्यांनी मांडला आहे, असे के. पी. पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article