Published on
:
25 Nov 2024, 12:01 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:01 am
करमाळा : 244 करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये करमाळा तालुक्यात अपवाद वगळता बहुतांश सर्वच ठिकाणी विजयी उमेदवार नारायण पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. करमाळा शहरासह प्रत्येक गावागावांमध्ये नारायण पाटील यांच्या मतामध्ये आघाडीत वाढच होत गेल्याचे दिसत आहे. करमाळा तालुक्यामध्ये गेल्या 2019 च्या निवडणुकी पेक्षा यंदा संजयमामा शिंदे यांच्या मतदानात वाढ झाली असली तरी मोठ्या प्रमाणात नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे.
2019 मध्ये नारायण पाटील यांनी 63299 मते करमाळ्यातील 17 व्या फेरी अखेर घेतले होते यंदा दहा हजाराने त्यांच्या मतात वाढ झाली असून त्यांनी 73 हजार हून अधिक मते घेतली. तब्बल दहा हजाराहून अधिक मतांची आघाडी करमाळा तालुक्यातील नारायण पाटील यांनी घेतली आहे. गेल्या 2019 च्या निवडणुकीत 9332 मते माढा तालुक्यातील छत्तीस गावांमधून त्यांनी घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र यात दुपटीपेक्षा अधिक मते घेऊन आपले वर्चस्व त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी 21 हजाराहून अधिक मते माढा तालुक्यातून घेतली. ही मते त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरली. टपाली मतदानात ही 2019 मध्ये नारायण पाटील यांनी 697 मते घेतली. यंदा मात्र चक्क 985 मते घेतली. म्हणजे 288 मतांची ह्या टपाली मतदानातही त्यांनी आघाडी घेतली. त्यांनी करमाळा शहरांमध्ये यंदा सहा हजार 571 मते त्यांनी मिळवले आहेत म्हणजे संजयमामा शिंदे यांच्यावर 3824 मतांची आघाडी करमाळ्यातच घेतली.
‘त्या’ 36 गावांवर जोर लावल्याने यश
या निवडणुकीमध्ये माढ्यातील 36 गावे विरुद्ध करमाळा तालुक्यातील 118 गावे असा एक प्रचार झाला होता. 118 गावाची आघाडी हे छत्तीस गावांमधून मोडली जायची. त्यामुळे यंदा सर्वच विरोधक यासाठी सतर्क झाले होते. यंदा तालुक्यातील मतदार जातीपातीत अडकला नाही. त्यामुळे तालुक्यातील उमेदवाराला अधिकाधिक मते पडली.