शिवमहापुराण कथेसाठी 60 एकरात केली व्यवस्था:दररोज 10 ते 12 लाखांवर भाविकांची राहणार हजेरी, शिरपूर येथे 30 नोव्हेंबरला कथाकार पंडित प्रदीप मिश्रांचे होणार आगमन

2 hours ago 1
शिरपूर शहरात जगद्विख्यात पंडित प्रदीप मिश्रा सिहोर वाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या काळात होणार आहे. शिव महापुराण उत्सव समितीतर्फे हेमंत पाटील, प्रसाद पाटील, रोहित शेटे, विशाल अग्रवाल, नीलेश अग्रवाल या उत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले. शहरात कायमच आगळे वेगळे व भव्य कार्यक्रम समितीतर्फे होत असतात. नुकतेच आयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त शिरपूर येथे महाराष्ट्रात भव्य रॅली व यज्ञ झाला. मांडळ शिवारातील भगवान महावीर उद्यान करवंद रोड शिरपूर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १० ते १२ लाख भाविक रोज कथास्थानी येतील. सुमारे ६० एकरापेक्षा जास्त जागेत कथा ऐकण्यासाठी बसण्याची सोय केली आहे. २० पेक्षा जास्त स्क्रीन मंडपात लावण्यात येणार आहे. स्वयंपाकासाठी १५ एकर जागा वेगळी करण्यात आली आहे. भाविकांना मुक्कामासाठी जवळच मंडप टाकून त्यांचे राहण्या खाण्याची सोय केली आहे. दहा हजार स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी नोंदणी समितीकडे केली आहे. ३५ समित्या स्थापन करून सेवेची विभागणी केली आहे. कथा स्थळापासून २ किमीच्या अंतरात पार्किंग उपलब्ध असणार आहे. ३ लाख रुद्राक्षांपासून शिवलिंग निर्मिती उत्सव समितीतर्फे ३ लाख रुद्राक्षापासून शिवलिंग तयार करून सोबत ३१ फुटी त्रिशूल कथेत ठेवण्यात येणार आहे. सिद्ध रुद्राक्षाचे ८ डिसेंबरला वाटप होणार आहे. शिवमहापुराण ग्रंथाची कलश यात्रा २९ रोजी सकाळी ९.३० वाजता पाटील वाडा येथून निघेल. ३० रोजी दुपारी पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन होणार असून, त्यांची शोभायात्रा निघणार आहे. शिवमहापुराण कथेसाठी सभामंडपाचे पूजन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article