Thackeray ShivSena |'शिंदेंचीच सेना फुटणार...!' खा. अरविंद सावंत यांचा खळबळजनक दावा File Photo
Published on
:
07 Feb 2025, 7:13 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:13 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: "टप्प्या टप्य्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकं फुटणार आणि ती भाजपसोबत जाणार", असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? असा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार करण्यात येत आहे. यावरून ठाकरेंच्या सर्व खासदारांनी आज (दि.७) पत्रकार परिषद घेत सर्व दावे खोडून टाकले. यावेळी आयोजित परिषदेत अरविंद सावंत बोलत होते.
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबात ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते. यावर आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलता अरविंद सावंत म्हणाले, "ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही खासदार शिंदेंच्या संपर्कात नाही. शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय त्यामुळेच खोट्या बातम्या ते पेरतायत. शिंदेंच्या सेनेकडून केवळ कपुड्या सोडण्याचे काम सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या सेनेवर फुटणार असे आरोप होत आहेत. परंतु, एकनाथ शिंदेंचाच एक मंत्री आमदारांसोबत भाजपात जातोय, असा दावा देखील सावंत यांनी केला आहे.
ठाकरेंची शिवसेना नाही तर, टप्प्या टप्य्यानं एकनाथ शिंदेंची लोकं फुटणार असून, ते भाजपसोबत जाणार असे देखील अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही भाजसोबत होतो पण भाजवासी झालो नाही. आज काँग्रेससोबत आहे परंतु आम्ही काँग्रेसवासी कधीच होणार नाही. कालही शिवसेनेत होतो आजही एकनिष्ठपणे शिवसेनेत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सर्व खासदारांची वज्रमुठ म्हणजे "टायगर जिंदा हैं', असे देखील खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद स्पष्ट केले. यावेळी अनिल देसाई यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.