शिवरायांच्या पुतळ्याची 15 फेब्रुवारीपासून उभारणी

3 hours ago 2

पहिल्या छायाचित्रात राजकोट येथे चौथर्‍याचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम तर दुस-या छायाचित्रात शिवरायांचा नवा पुतळा.pudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 1:20 am

Updated on

31 Jan 2025, 1:20 am

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या प्रत्यक्ष पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या राजकोट येथे चौथर्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महाराष्ट्र कला संचलनालयाने पुतळ्याच्या ‘क्ले मॉडेल’ला मंजुरी दिली आहे. या पुतळ्याची उंची 60 फूट उंच असून, तो ब्राँझ धातूपासून बनविण्याचे काम दिल्ली जवळील नोएडा येथे सुरू आहे. या पुतळ्याच्या धातूची जाडी 8 मि. मी. इतकी असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण येथे आले होते. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारलेल्या पुतळ्याचेे अनावरण केले होते. मोठा समारंभ घेवून या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर केवळ आठ महिन्यात हा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात खळबळ माजली होती. महाराष्ट्रात तर या मुद्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण, आरोप-प्रत्यारोप झाले होते. विधानसभा निवडणुकीतही प्रचार सभांमध्ये हा मुद्दा गाजला होता. हा पुतळा बनविणार्‍या शिल्पकार जयदीप आपटे आणि आर्कीटेक्ट चेतन पाटील यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आपटे आणि पाटील या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. अलिकडे या दोघांना जामिनही मिळाला आहे.

दरम्यान, हा पुतळा कोसळल्यानंतर तत्कालीन महायुती सरकारने या पुतळ्याची पुर्नउभारणी करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. भव्य-दिव्य पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन त्यावेळी सरकारने दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने तातडीने हालचाली सुरू करत या कामाची निविदा काढली. 20 कोटी रूपये प्रत्यक्ष पुतळ्याच्या कामाला लागणार असून आजुबाजुच्या सुशोभिकरणासाठी आणखी 80 कोटी लागणार आहेत. पैकी 20 कोटी रूपयाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे.

या कामात मात्र सरकारने काळजीपूर्वक पावले उचलली असून या संपूर्ण कामाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. कार्यकारी अभियंता महेंद्र केणी आणि उपअभियंता अजित पाटील या कामाचे प्रत्यक्ष सुपरव्हिजन करत आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने अनुभवी शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि. या कंपनीकडे दिली आहे. या कंपनीकडुन नोएडा येथे कास्टींगचे काम सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कसा असावा, हे दर्शविणारे क्ले मॉडेल महाराष्ट्र कला संचलनालयाकडून मंजूर करण्यात आले असून, ते 4 फूट उंचीचे आहे. सध्या राजकोट येथे 10 फूट उंच चौथरा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामात आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. हा पुतळा 15 एप्रिलपर्यंत उभारून पूर्ण होईल आणि तो पुढील किमान 100 वर्षे टिकेल, अशी माहिती संबंधितांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article