शिवसैनिकांनी महायुती धर्म पाळून काम करावे:अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात सेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे आवाहन‎

2 hours ago 1
तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांचा मानसन्मान ठेवला जाईल. पण महायुतीधर्म पाळून नेते देतील ते उमेदवार निवडून आणण्यास सहकार्य करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मी शिवसैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बहीणींना पैसे मिळत आहेत. मात्र राजकारणातील सावत्र भाऊ बहिणींची ही लोकप्रिय योजना बंद कशी पडेल यासाठी कोर्टात गेले, अशी टीका शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केले. गुरुवारी अकोल्यातील महाराजा लॉनवरील अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेनेचे शिर्डी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे होते. सेनेचे पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी, कमलाकर कोते, महिला जिल्हाप्रमुख शेळके, सुषमा दराडे, जिल्हा महिला संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, नितीन औताडे, तालुका प्रमुख सुभाष गायकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एकनाथ यादव यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव गोर्डे यांनी केले. राजेंद्र चौधरी म्हणाले, लोकसभेत अकोल्यात घडले ते घडायला नको होते. यामुळे आपला लोकसभेत उमेदवार पराभूत झाला. इथल्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून महायुतीधर्म न पाळल्याने महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे विजयी करण्यात आपण गाफील राहिलो. त्यामुळे मानसन्मान बाजूला ठेवा व उमेदवार कोण दिला, हे न पाहता प्रामाणिक काम करा, असे आवाहन केले. बाजीराव दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमच्या घरचे लग्न होते व वाद निर्माण होऊ नये म्हणून आमच्या सेनेच्याच व्यासपीठावर येण्यास आम्हास मज्जाव केला. तो घोर अपमानही गरज म्हणून सहन केला. शहरप्रमुख गणेश कानवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. आकोल्याचा महायुतीचा उमेदवार बदला : दराडे बाजीराव दराडे म्हणाले, अकोले मतदारसंघातून उमेदवार म्हणून डॉ. किरण लहामटे याचा प्रचार करूच शकत नाही. त्यांना मतदान देऊ शकत नाहीत, हे मी शिवसैनिकांच्या वतीने मी सांगतो. अजूनही वेळ गेलेली नाही. इथे राष्ट्रवादीने उमेदवार लहामटे दिल्यास पाडल्याशिवाय हे शिवसैनिक शांत बसणार नाहीत. नेते म्हणून हा निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवून उमेदवार बदला, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article