शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने चौघांना 50 लाखांचा गंडाFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 7:04 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:04 am
पुणे: शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी चौघांना 49 लाख 99 हजार 755 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बाणेर पाषाणमधील 44 व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 17 लाख 74 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादींसोबत संपर्क केल्यानंतर विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे औंधमधील 44 वर्षीय व्यक्तीला सहा लाख 25 हजार 755 रुपयांचा गंडा घातला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार औंध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मांजरी बुद्रुकमधील 39 वर्षीय व्यक्तीची अडीच लाख रुपायंची शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा येथील 37 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी फिर्यादींना दाखविले. फिर्यादींनी सायबर चोरट्यावर विश्वास ठेवत गुंतवणूक केली.