शेर्पे येथील तरुणाचा नापणे धबधब्यात बुडून मृत्यू

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Nov 2024, 12:30 am

Updated on

17 Nov 2024, 12:30 am

वैभववाडी ः मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे (वय 30, रा. शेर्पे भट्टवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

मयत विक्रम नमसे हा आपल्या दोन मित्रांसह गोठणे नदीवरील नापणे येथील धबधब्यावर फिरायला गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला. मित्रांसमवेत तो धबधब्याच्या वरच्या बाजूला आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला पोहताही येत नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो मयत झाला. विक्रम आपल्या आई-वडिलांसमवेत शेर्पे येथे राहात होता. आई-वडील आजारी असतात. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तर त्याचा एक भाऊ कामानिमित्त मुंबई येथे राहतो.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी पोलिस कर्मचारी बिलपे, उद्धव साबळे, महिला पोलिस श्रीमती पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article