श्री विठ्ठल- रुक्मिणी संस्थान कौंडण्यपुरात दहीहंडी सोहळा:हरिनामच्या गजराने दुमदुमून कौंडण्यपूर नगरी; भाविकांची मांदियाळी

2 hours ago 1
श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे जय हरी विठ्ठलाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कार्तिक मास सोहळ्याच्या समारोपाला शनिवारी दुपारी ४ वाजता जगद्गुरु राज राजेश्वराचार्य महाराज, आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा पार पडला. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथा माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर येथे ९ नोव्हेंबरपासून कार्तिक मास सोहळ्याला सुरुवात झाली. ९ दिवसांपासून या सोहळ्यात पहाटे काकडा आरती, कीर्तन, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या उत्सवाकरिता शुक्रवारी रात्रीच विदर्भातील विविध संस्थांमधील पालख्या कौंडण्यपुरात दाखल झाल्या होत्या. १६ नोव्हेंबरला सकाळी ७.३० वाजता पंकज महाराज महल्ले यांच्या नेतृत्वात नगरप्रदक्षिणा झाली. संस्थेचे उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त अशोक पवार, विश्वस्त सुरेश चव्हाण, विश्वस्त अतुल ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच गावकरी व पंचक्रोशीतील सर्व वारकरी भक्तांच्या सहकार्याने नगरप्रदक्षिणाचा कार्यक्रम होईल. तसेच सकाळी ५ ते ७ महापूजा, १० ते ११ या वेळेत गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांचे खंजिरी भजन, दुपारी १२ ते २ कीर्तनकार जयेश महाराज भाग्यवंत (श्रीमलंगगड डोंबिवली) यांचे काल्याचे कीर्तन. दुपारी २ ते ३ संत जितेंद्रनाथ महाराज (पीठाधिश्वर,देवनाथ मठ, अंजनगाव भुर्जी) यांचे प्रवचन झाले. दु. ३ ते ४ या वेळेत जगद्गुरु श्री राजराजेश्वराचार्य महाराज (माऊली सरकार पीठाधिश्वर, रुक्मिणी पीठ, अंबिकापूर) यांचे उद्बोधन आणि सायं.४.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा पार पडला. हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून दहीहंडीचा लाभ घेतला. या सोहळ्याला तिवसा पं. स. सभापती कल्पना दिवे, उपसभापती रोशनी पुनसे, सरपंच प्रेमदास राठोड, ग्रा. पं. सदस्य प्रशांत ठाकरे, संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अशोक पवार, सुरेश चव्हाण, अतुल ठाकरे यांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article