मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्याची प्रथा आहे. यात अनेकदा प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण वाटप केले जाते. मात्र काही सूज्ञ महिलांनी पर्यावरणपूरक हळदीकुंकू साजरा करण्यावर भर दिला आहेत. ‘प्लास्टिक सोडा, पर्यावरणाची नाते जोडा' असा संदेश देत यंदा शहरातील अनेक महिलांनी पर्यावरण पूरक वाणाचे पर्याय शोधून काढले आहे. यात मातीचे दागिने, कापडी व ज्यूटच्या पिशव्या, तसेच चांदीच्या वस्तू भेट दिल्या जात आहे. दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकू उत्साहात साजरे करण्यात येत आहे. अनेक गृहिणी, महिला मंडळे व राजकीय पक्ष यासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील मातीचे दागिने घडवणाऱ्या स्वाती मते सांगतात, अनेक हळदीकुंकू पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संक्रांतीसाठी अनेक महिलांनी मातीचे उर्वरित पान ४ पर्यावरण संरक्षणात हातभार लावला ^भारतीय सण आणि निसर्ग यांचे अतूट आहे. यासाठी छोटेसे पाऊल उचलले आहे. हळदीकुंकू कार्यक्रमाला वाण म्हणून ज्यूटच्या आकर्षक पिशव्या वाटणार आहे. आठवडा बाजारातून त्यांची आगाऊ खरेदी केली आहे. या पर्यावरण स्नेही पिशव्या किमान १५ ते २० घरात जाणार आहेत आणि प्रत्येक घरातील व्यक्ती या पिशव्यांचा वापर करतील आणि प्लास्टिक पिशवीचा वापर आपोआप कमी होण्यास मदत होईल. - स्वाती तायडे, गृहिणी ५० ते २०० पासून मातीचे अनोखे दागिने ^महिलांमध्ये पर्यावरणपूरक संक्रांत साजरा करण्याकडे कल वाढता आहे. यातूनच अनेक महिलांनी माझ्याकडून मातीचे दागिने खरेदी केले आहे. ५० रुपयापासून कानातले, तर २५० पासून गळ्यातला सेट अनेकांनी खरेदी केला आहे. महिलांसाठी दागिने अनोखी भेट ठरत आहे. स्वाती मते, मातीचे दागिने विक्रेता
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)