Published on
:
23 Jan 2025, 5:37 am
Updated on
:
23 Jan 2025, 5:37 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. (Hydrabad Crime News) रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट येथील माजी लष्करी जवान गुरुमूर्ती यांनी त्यांची पत्नी वेंकट माधवी (वय.35) हिची हत्या केली. अन् त्यांनतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये उकळले. यानंतर त्याने ते उकळलेले मृतदेहांचे तुकडे जिलेलगुडा येथील चंदन तलाव परिसरात फेकुन दिले. हा गुन्हा रचकोंडा आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मीरपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.
Telangana | Meerpet missing woman case | According to the DCP of LB Nagar, "A missing case was reported on 17th January, where a man has claimed that he killed his wife, chopped her body parts and threw them into a lake. We are investigating to find out the truth." https://t.co/OFPbW3Gejt
— ANI (@ANI) January 23, 2025महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या पालकांनी या 13 जानेवारी रोजी मिरपेट पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपी गुरुमूर्ती प्रकाशम जिल्ह्यातील जेपी चेरुवू येथील रहिवासी आहे. डीआरडीओमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो त्याची पत्नी वेंकट माधवी आणि त्यांच्या दोन मुलांसह जिलेलगुडा येथील न्यू वेंकटेश्वर नगर कॉलनीमध्ये राहत होता.
संशयिताने पोलिसांना ठेवले अंधारात
जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा संशयित आरोपी गुरुमूर्तीने घटनेची माहिती नसल्याचे भासवले आणि त्याच्या सासरच्या लोकांसह चौकशीसाठी पोलिस ठाण्यात गेला. मात्र, नंतर तपासादरम्यान, गुन्ह्याशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुमूर्तीने संशयाच्या आधारे पत्नीची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात, त्याने प्रेशर कुकरमध्ये शरीराचे काही भाग उकळले. या प्रकरणाची अधिक चौकशी गुप्तता पाळत केली जात आहे.