कोल्हापूर : सहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार राहिलेल्या कोल्हापूर येथील मटका बुकी सम्राट कोराणे - मुंबईतील कुख्यात मटका किंग पप्पू सावला टोळीचे आंतरराष्ट्रीय गँगस्टर असलेल्या गुंडांशी आर्थिक लागेबांधे असल्याचे पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या टोळीतील अन्य संशयितांच्या चौकशीत उघड झाले आहे, असा खळबळजनक युक्तिवाद विशेष सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी शुक्रवारी विशेष मोका न्यायालयात केला. सम—ाट कोराणे याची मालमत्ता गुन्हेगारी कटातून कमवल्याचा संशय आहे. त्यामुळे खोलवर तपास होण्याची आवश्यकता आहे, असेही विशेष सरकारी वकिलांनी युक्तिवादात सांगितले.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई झालेला आणि कोल्हापूर पोलिसांना सहा वर्षे चकवा देत फरारी राहिलेला कुख्यात मटका बुकी सम—ाट सुभाष कोराणे (42, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयाला शरण आला. विशेष न्यायाधीश (मोका न्यायालय) डी. व्ही. कश्यप यांच्या निर्देशानुसार सम—ाट कोराणे याचा पोलिस उपअधीक्षक तथा तपासाधिकारी अजित टिके यांनी त्यास आज शुक्रवारी सकाळी कळंबा कारागृहातून ताबा घेतला. वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी सम—ाट कोराणे यास विशेष न्यायाधीश (मोका न्यायालय) डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील अॅड. अमित महाडेश्वर म्हणाले, मोका अंतर्गत कारवाई होऊनही संघटित टोळीतील महत्त्वाचा साथीदार असलेला सम—ाट कोराणे सहा वर्षांपासून फरारी आहे. कोराणे याच्या शोधासाठी तसेच तपास अधिकार्यांसमोर हजर होण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाने यापूर्वी चारवेळा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तरीही दाद न देता तो फरारी राहिला.
अवैध मार्गाने बेनामी मालमत्ता केल्याचा युक्तिवादात संशय
अॅड. महाडेश्वर पुढे म्हणाले, कोल्हापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा खोलवर तपास करून सम—ाट कोराणे व स्वत:ला मुंबईतील मटका किंग समजल्या जाणार्या पप्पू सावला टोळीतील 44 संशयिताविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या टोळीतील संशयितांनी अवैध व्यवसाय, गैरमार्गाने बेनामी मालमत्ता केली आहे. गुन्हेगारी कटातून कमवलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा का, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी युक्तीवादातून स्पष्ट केले.
गँगस्टर्सना ‘प्रोटेक्शन मनी’ पुरविल्याचा संशय
अवैध मार्गाने टोळीने बेनामी मालमत्ता केली आहे. टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी म्होरक्यांसह साथीदारांचे आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे गॅगस्टर्स रवी पुजारी, अरुण गवळीसह अनेक कुख्यात गॅगस्टर्सना ‘प्रोटेक्शन मनी’ पुरविल्याचा संशय या गुन्ह्यात अटक झालेल्या काही संशयितांच्या चौकशीतून पुढे आला आहे. त्यामुळे सम—ाट कोराणे, पप्पू सावला टोळीचे आणखी किती गॅगस्टर्सशी संबंध निर्माण झाले आहेत, याचा चौकशीत उलगडा होण्याची गरज आहे, असेही अॅड. महाडेश्वर यांनी युक्तिवादात स्पष्ट केले.
आश्रयदात्यावरही मोकाअंतर्गत कारवाई : विशेष सरकारी वकील
विशेष सरकारी वकील पुढे म्हणाले, फरार काळात सम—ाट कोराणे कोणाकडे वास्तव्याला होता, त्याला कोणाचा आश्रय होता, त्याच्या मुक्कामाचे ठिकाण कुठे होते, कोणाच्या संपर्कात राहिला, याचाही तपास होण्याची गरज आहे. चौकशीत संशयितांची नावे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर सहआरोपी करून त्याच्यावरही मोकाअंतर्गत कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
30 दिवस पोलिस कोठडीची मागणी
मोका अंतर्गत कायद्यानुसार सम—ाट कोराणे याच्यावर कारवाई झाली आहे. सहा वर्षांनंतर तो पोलिसांच्या हाताला लागला आहे. या काळात त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा का, तपास खोलवर होण्यासाठी न्यायालयाने त्यास 30 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. अमित महाडेश्वर यांनी युक्तिवादात केली.
कोर्टात वकिलांची खचाखच गर्दी
विशेष न्यायाधीश (मोका न्यायालय) डी. व्ही. कश्यप यांनी सम—ाट कोराणे याला 12 दिवसांची पोलिस कोठडी दिली. सम—ाट कोराणे याच्या वतीने अॅड. एस. वाय. माने यांनी युक्तिवाद केले. यावेळी न्यायालयात पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह वकिलांची मोठी गर्दी झाली होती.