Salman Khan And Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून संन्यास घेतल्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर ममता हिने बॉलिवूडचा निरोप घेतला. ममता हिने अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख यांसारख्या सेलिब्रिटींसोबत 40 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘करण अर्जुन’ सिनेमानंतर ममताच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने एक मजेदार किस्सा सांगितला आहे. मुलाखतीत जेव्हा ममताला विचारण्यात आलं, ‘कधी तुझ्या सहकलाकारांवर ओरडली आहेस का?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हाला हे शाहरुख खानने सांगितलं आहे?’
‘त्या दिवशी नक्की काय झालं मी तुम्हाला सांगते, चिन्नी प्रकाश ‘करण अर्जुन’ सिनेमाचे दिग्दर्शक होते. शाहरुख आणि सलमान शुटिंगसाठी गेलेले आणि मी एकटी बसली होती. जवळपास दीड तासानंतर मला बोलावलं. चिन्नी प्रकाश यांच्या मॅनेजरने माझा दरवाजा ठोठावला आणि त्याने सांगितलं मास्टरजीने बोलावलं आहे.’
‘मास्टरजींना बोलावल्यामुळे मी तिकडे गेली. सलमान – शाहरुख तिथे माझ्या जवळून गेले आणि हसत होते. रात्रीचे 8 वाजले होते. मास्टरजी म्हणाले. ही खास स्टेप उद्या तू एकटी करणार आहेस. मला वाटलं की ते असं का बोलत आहे? मग दुसऱ्या दिवशी माझा पहिला शॉट होता. आणि मी पाहिलं की शाहरुख आणि सलमान दोघेही झुडपातून माझ्याकडे बघत होते. आणि दोघे हसत होते.
पुढचा शॉट दोघांचा होता. 5000 लोकांसोबत त्यांना स्टेप करायची होती. त्यांनी बरेच रिटेक घेतले. ज्यामुळे दिग्दशकांना पॅकअप केलं. त्यानंतर आम्ही सर्व खोलीच्या दिशेने पळत गेलो. संध्याकाळी त्याने माझी टिंगल केली होती हे मला माहीत होतं. त्याने मला कोरिओग्राफरच्या माध्यमातून सर्व स्टेप्स करायला सांगेल असं मला वाटत नव्हते. त्यामुळे तो पळून गेल्यावर मीही त्याच्या मागे धावले. मात्र, नंतर सलमानने मला थांबवलं. आणि तोंडावर दरवाजा बंद केला.’ असं ममता कुलकर्णी म्हणाली.