सुप्रियाताईंनी हxxखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होते:हसन मुश्रीफांचा हल्लाबोल, समरजित घाटगेंवर नाव न घेता साधला निशाणा

2 hours ago 1
रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबईत कागल गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठी मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे या समरजितसिंह घाटगे यांच्या पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना म्हणाल्या, कागलमध्ये ईडी पोहोचल्यावर घरातील पुरुष मागे बसले होते. मात्र, घरातील महिला पुढे आल्या होत्या, अशी खोचक टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ म्हणाले, कागलमध्ये ईडी कोणामुळे आली याची माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यायला हवी होती. त्या हxxxखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जाणे टाळायला पाहिजे होते. पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मुंबईमध्ये झालेला हा मेळावा न भूतो न भविष्यती झाला आहे. मुंबईमधील मेळाव्यासाठी 3 हजारांवर लोक येणे अपेक्षित होते. मात्र, 5 हजारांवर लोक उपस्थित झाले. लोकांची संख्या वाढल्याने थोडी गैरसोय झाली. पुढे ते म्हणाले की गावात झालेली कामे त्यांनी सणासुदीला घरी आल्यानंतर पहिली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर देखील भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला होता. यावर हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला असताना ते म्हणाले, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही. तसेच तिन्ही पक्षाचे नेते बैठकीला बसतील आणि त्यानंतर कोणाला किती जागा मिळतील हे ठरवले जाईल, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article