Published on
:
06 Feb 2025, 1:30 am
Updated on
:
06 Feb 2025, 1:30 am
सोशल मिडियातून अनोळखी तरुणींकडून तरूणांना, सेक्टॉर्शनच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचा नवीन फंडा चांगलाच रूजू लागला आहे. या विळख्यात तरुणाई नकळतपणे अडकू लागली आहे. याचा मोठाच फटका ऑनलाईन राहणार्या तरुणाईला बसू लागला आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय : सेक्सटॉर्शनचे बळी होण्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. खरे तर आता सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार आता सेक्सटॉर्शनकडे वळले आहेत. पुरावा उघड करण्याची धमकी देऊन, एखाद्याकडून पैसे उकळण्याची; किंवा लैंगिक इच्छेची मागणी यात केली जाते. विशेष म्हणजे आता महिला गुन्हेगार ‘कॅमेर्या’च्या मागे आहेत; यामुळे सायबर फसवणूक करणारे केवळ पुरुषच आहेत असे नाही; तर अनेकवेळा काही महिलाही याचा गैरफायदा घेत आहेत. सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक खंडणी होय. हा एक ब्लॅकमेलचाच नवा प्रकार आहे. यात सायबर गुन्हेगार लैंगिक अनुकूलता, पैसे किंवा इतर स्वरुपाची मागणी करतात.
यात गुन्हेगाराकडे काही तडजोड करणार्या प्रतिमा, व्हिडिओ किंवा पीडित व्यक्तीकडे असण्याचा हेतू असतो. जर पीडितेने अधिक सामग्री दिली नाही; लैंगिक कृत्ये केली नाहीत किंवा पैसे दिले नाहीत, तर ते ऑनलाइन प्रकाशित करण्याची किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकार्यांसोबत शेअर करण्याची धमकी यात दिली जाते.
सेक्स्टॉर्शनची सुरुवात : सेक्स्टॉर्शनची सुरुवात साधारणपणे सामान्यत: अनोळखी तरुणींकडून समाजमाध्यमात फ्रेंड रिक्वेस्टने होते. अनेकवेळा तरुणाई आपला बराच वेळ समाजमाध्यमांवर घालवत रहते. याच दरम्यान, उत्सुकतेने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीजाते. त्यातून चॅटिंग सुरु होते. काही मेसेज आणि नंतर संभाषण, अधिक खाजगी होत जाते. नंतर व्हॉटसअॅप सुरु होते. यातून नंबर शेअर केला जातो. यातूनच नंतरच्या गोष्टी वेगाने घडतात. काही बघायचे आहे का अशी विचारणा तिकडून होते. तसेच बाथरूम जावा सूचनांचे पालन करा असे सांगजण्यात येते. काही क्षणातच एक व्हिडिओ कॉल येतो. तुम्ही इतके उत्साहित आहात की, तुम्ही स्त्रीला किंवा पुरुषाला स्पष्टपणे पाहू शकत नाही, मात्र पाहण्याची उत्सुकता असते. यात काहीच क्षण जातात.
पण खरी गेम इथेच सुरू होते. काही वेळाने तरुणाचा मोबाईल वाजतो आणि भयानक घटनाक्रम सुरू होतो. नुकत्याच एन्जॉय केलेल्या व्हिडिओ चॅटची रेकॉर्ड केलेली क्लिप, कोणीतरी पाठवलेली असते. पैसे द्या अन्यथा क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मात्र पैसे देऊन देखील अशा सेक्सटॉर्शनचा शेवट होतोच असे नाही. बदनामीची भीती घालून आर्थिक लूट सुरु होते. यासाठीच आता ‘ऑनलाईन’ असताना अखंड राहणे सावध हेच गरजेचे!
आता अशा या सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अनेक तरुण अलगद बळी पडू लागले आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत. एखादीच रेकॉर्डवर येते तर अनेक घटना ‘रेकॉर्ड’वर येत नाहीत इतकेच..मात्र म्हणूनच याचे गांभीर्य वाढत राहिले आहे.
गरज याची :
अनोळख्या व्यक्तीची विशेषत: अनोळखी तरुणींची फ्रेंड रिक्वेस्ट कदापि स्वीकारू नका.
अपरिचित व्हॉटसअॅप कॉलवर अजिबात संवाद साधू नका.
व्हिडीओ, छायाचित्र शेअर करताना पाठवतांना विचार करा.
या सार्यात काही चुकीचे घडतेय असे वाटल्यास आपल्या कुटुंबियांना, मित्र - मैत्रिणीला किंवा पोलिसांना तातडीने कल्पना द्या.
आता सर्वत्र वेगवान इंटरनेटचा वापर खुला झाला आहे. एखादाच अपवाद वगळता सर्व वयोंगट, विविध समाजघटकांत स्मार्ट मोबाईल नवीन राहिलेला नाही. मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने या स्मार्ट मोबाईलमधून सोशल माध्यमांचा वापर सातत्याने वाढता राहिला आहे. अशा ‘ऑनलाईन’ तरुणांना हेरून सायबर गुन्हेगार पाळत ठेवतात. तसेच ‘ऑनलाईन’ मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. यातून सावज अलगद त्यांच्या जाळ्यात अडकते. यातून असे सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत राहतात. यामुळे आता स्मार्ट मोबाईल च्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करताना कमालीचे गांभीर्य राखणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर ओळख करणे, या मैत्रीचे एका भावनिक नात्यात त्या मैत्रीचे परिवर्तन करणे. आणि ब्लॅकमेल करुन हळूहळू पैसे उकळणे अशा घटनांना यातूनच खतपाणी मिळू लागले आहे.