स्मरण इतिहासाचे... .:बार्शीत आज शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण अन् शिवसृष्टीचे लोकार्पण, राज-विजय मंडळाकडून शिवरायांचा पुतळा भेट

2 hours ago 1
बार्शी बार्शीतील मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवारी ( दि. ११) सकाळी ११ वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते, आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत होत आहे. या शिवसृष्टीमुळे बार्शीच्या वैभवात भर पडली आहे. बार्शी शहरातील विविध शिवप्रेमी संघटनांची छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी व्हावी अशी भावना होती. त्याला आमदार राजेंद्र राऊत यांनी मूर्त रूप देण्याचा निश्चय केला व पालिकेतील सत्ता काळात ठराव करून शिवसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. बार्शी शहरातील जुन्या जवाहर हॉस्पिटल प्रांगणात ६ जानेवारी २०२० रोजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व तत्कालीन नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले होते. नगर पालिका फंडातून सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्चातून हे काम झाले आहे. फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा शिवसृष्टीतील चबुतऱ्यावर बसवण्यात आला आहे. शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग भित्तीचित्राच्या माध्यमातून शिवप्रेमींना स्फूर्ती देत आहेत. बार्शीत साकारलेली शिवसृष्टी. यामध्ये शिवरायांच्या जीवनावरील अनेक प्रसंग चित्रीत केले आहेत. या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगापैकी काही प्रसंगाची भित्तीशिल्पे तयार करण्यात आली आहेत. शिवजन्माचा आनंदादायी सोहळा, सोन्याच्या नांगराने पुण्याची जमीन नांगरतानाचा प्रसंग, शिवरायांचे शस्त्र व अश्व शिक्षण, स्वराज्याची शपथ, न्याय निवाडा, संत तुकाराम महाराज व शिवराय भेट, पावनखिंड, आग्रा भेट व सुटका, आधी लगीन कोंढाण्याचे, आरमार स्थापना, गडकोटीांची उभारणी, राज्याभिषेक अशी १२ भित्तीशिल्पे शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. तसेच चबुतऱ्याच्या बाजूला चार बुरूज आहेत. दोन बुरूजावर तोफांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तर दोन बुरुजांवर भाल्यासह मावळे उभे आहेत. शिवकालीन चिरेबंदी असलेली दगडी भिंत शिवसृष्टीमध्ये पाठीमागील बाजूस असून दगडी भिंतीला मधोमध शिवकालीन लाकडी दरवाजा बसवण्यात आला आहे. शिवसृष्टीच्या मधोमध चबुतऱ्यावर छत्रपती शिवरायांचा ११ फुटांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article