हरियाणा निवडणूक निकालात विलंब, काँग्रसचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

08 Oct 2024, 12:29 pm

Updated on

08 Oct 2024, 12:29 pm

नवी दिल्ली: हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाच्या विलंबावरुन काँग्रसने केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. हरियाणा निवडणूक निकालाची आकडेवारी संकेतस्थळावर अद्ययावत करण्यास आयोगाने विलंब केल्याचा आरोप काँग्रसने मंगळवारी (दि.१०) सकाळी केला. त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर देताना, हे आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचे म्हटले.

मतमोजणीत विलंब काँग्रेसचा आरोप, आयोगाला पत्र

मंगळवारी, हरियाणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असताना काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक आयोग संकेतस्थळावर आकडेवारी अद्ययावत करण्यास विलंब करत आहे, असा आरोप केला. निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आचार नियमांच्या नियम ६० नुसार केली जात असल्याचे आयोगाने सांगितले.

आरोपाबाबत कोणतेही पुरावे नाहीत; ECI

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उमेदवार, निरीक्षक आणि सूक्ष्म निरीक्षकांच्या उपस्थितीत सुरू आहे, असे निडवणूक आयोगाने सांगितले. जयराम रमेश यांनी आरोप करताना कोणत्याही विशिष्ट मतदारसंघात विलंब झाल्याचे स्पष्ट करण्यासाठी कोणतेही तथ्यात्मक पुरावे दिलेले नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article