हांडे-पाटील तालमीच्या मल्लांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली.
Published on
:
22 Jan 2025, 12:47 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:47 am
सांगली : हांडे-पाटील तालमीतील तीन मल्लांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली आहे. 67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धा या 20 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अखेर अहिल्या नगर येथे होणार आहेत.
सोलापूर जिल्हा निवड चाचणीमध्ये हांडे-पाटील तालमीतील साहिल कुदळे व ओम हिप्परकर यांची 61 किलो वजनी गटात झालेल्या कुस्ती स्पर्धेत गादी व माती प्रकारात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तर अहिल्यानगर येथे होणार्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात 67 किलो वजनी गटात अशपाक तांबोळी याचीही निवड झाली आहे. संचालक सुजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते या तिघांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना वस्ताद अमोल खंबाळे, निवेदक जोतिराम वाजे, विजय खेत्रे आदींचे मार्गदर्शन मिळाले.