Mahakumbh 2025 Golden Baba | '१५ वर्षांपासून अंगावर ६.८ किलो सोने...' ! महाकुंभतील 'गोल्डन बाबा' आहेत तरी कोण?ANI X
Published on
:
18 Jan 2025, 6:23 am
Updated on
:
18 Jan 2025, 6:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Mahakumbh 2025 Golden Baba | उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरु आहे. सहा दिवसांत जगभरातून कोट्यवधी भाविक या महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. देशभरातील साधू, नागा साधुंचीदेखील या मेळाव्याला मोठी उपस्थिती आहे. या महाकुंभमध्ये गेली १५ वर्षांपासून अंगावर ६.८ किलो सोने घालणारे 'गोल्डन बाबा'देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
तर तुम्ही माझ्याशी बोललादेखील नसता...; महामंडलेश्वर नारायणंद गिरी महाराज
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील कुंभमेळ्यात सनातन धर्म फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष, निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नारायणंद गिरी महाराज उर्फ गोल्डन बाबा सहभागी झाले आहेत. त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "जर मी पॅँट आणि शर्ट घातले असते तर तुम्ही माझ्याशी बोलायलादेखील आला नसता. देवाने मला सकारात्मक ऊर्जा पसरवण्याची ही संधी दिली आहे..."
माझ्या अंगावर ६.८ किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने; गोल्डन बाबा
पुढे महामंडलेश्वर नारायणंद गिरी महाराज उर्फ गोल्डन बाबा म्हणाले, "माझे नाव श्री श्री १००८ अनंत श्री विभूषित स्वामी नारायण नंद गिरीजी महाराज आहे. मी केरळचा आहे आणि मी सनातन धर्म फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. मी ६.८ किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने घालतो. मी हे १५ वर्षांपूर्वी घालायला सुरुवात केली होती".
#WATCH | Prayagraj, UP | Mahamandaleshwar Narayanand Giri Maharaj of Niranjani Akhada alias Golden Baba says, "My name is Shri Shri 1008 Anant Shri Vibhushit Swami Narayan Nand Giriji Maharaj. I am from Kerala, and I am the Chairman of Sanatana Dharma Foundation... I am wearing… pic.twitter.com/xtsAVipPYd
— ANI (@ANI) January 18, 2025