2017 ते 2019 दरम्यानची घटना, मात्र आता आली उघडकीस:पुण्यात बँकेच्या 49 एटीएम सेंटरचा विद्युत पुरवठा बंद करून सव्वा कोटी लांबवले

2 hours ago 1
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४९ एटीएम सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित करून १ कोटी २८ लाख ७६ हजाराचा गंडा घालण्यात आला. भामट्याने प्रत्यक्ष बँकांच्या शाखांत जाऊन अर्ज करून हे पैसे स्वत:च्या खात्यात वर्ग केले. हा प्रकार तब्बल अडीच वर्षे सुरू होता. या प्रकरणी टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लिमिटेडच्या वतीने अमित मोहन चव्हाण (५०, रा. ठाणे) यांनी तक्रार दिली आहे. एटीएम मशीनच्या व्यवस्थापनाचे काम टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन ही कंपनी करते. कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ४९ एटीएम सेंटर उभारली. मात्र, मशीनमध्ये पैसे टाकण्याचे काम दुसरी कंपनी करत होती. दोन्ही शहरात २०१७ पासून एटीएममधून तांत्रिक बिघाडामुळे पैसे निघाले नाहीत. मात्र, ते खात्यातून कट झाल्याचे तक्रार अर्ज बँकेच्या विविध शाखांत ४९ एटीएएम सेंटरसंदर्भात ग्राहकांनी केले होते. त्यानुसार बँकेने संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली. बँकेलाही संबंधित ट्रान्झॅक्शनच्या वेळेस तसा तांत्रिक बिघाड झाल्याने पैसे डिलिव्हर न झाल्याचे संदेश आले होते. दरम्यान, पैसे काढताना एक जण सीसीटीव्हीत चित्रित झाला असून याचा तपास सुरू आहे. पैसे बाहेर येताच विद्युत पुरवठा खंडित ट्रान्झॅक्शन न झाल्याचा संदेश आलेल्या वेळी प्रत्यक्षात ती रक्कम एटीएम सेंटरमधून काढली गेली होती. यामुळे देखभाल करणाऱ्या कंपनीकडून बँकेने ही रक्कम वसूल केली. टाटा कंपनीने एटीएमचा अभ्यास केला असता एटीएममधून पैसे बाहेर येताच विद्युत पुरवठा बंद केला जात होता. यामुळे पैसे न मिळाल्याचा संदेश बँकेला जात होता. दरम्यान, बँकेने तक्रार करून पाठपुरावा न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article